PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 03 NOV 2021 7:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 3 नोव्हेंबर 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

 

  • 107.29 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 11,903 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 98.22%; Highest since March 2020
  • 14,159 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,36,97,740
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.44%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 1,51,209; lowest in 252 days
  • Daily positivity rate (1.11%) less than 2% for last 30 days
  • Weekly Positivity Rate (1.18%) less than 2% for last 40 days
  • 61.12 cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona                                                 #IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA
*****

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 41,16,230 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 107.29 कोटी (1,07,29,66,315) चा टप्पा पार केला आहे. देशभरात 1,07,96,018 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे-

Cumulative Vaccine Dose Coverage

 

HCWs

1st Dose

1,03,79,388

2nd Dose

92,41,804

 

FLWs

1st Dose

1,83,72,027

2nd Dose

1,59,78,102

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,16,99,772

2nd Dose

14,63,65,144

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,56,56,368

2nd Dose

9,76,99,540

 

Over 60 years

1st Dose

11,02,04,447

2nd Dose

6,73,69,723

Total

1,07,29,66,315

 

गेल्या 24 तासांत 14,159 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,36,97,740 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.22 % आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 129 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 11,903 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 1,51,209 इतकी आहे आणि ही गेल्या 252 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.44 % आहे जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,68,514 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 61 कोटी 12 लाखांहून अधिक (61,12,78,853 ) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.18% असून गेले 40 दिवस हा दर 2% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.11 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 30 दिवस 2% हून कमी आहे आणि आता गेले सलग 65 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे.

इतर अपडेटस्

Tweets Links

 

***

S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1769322) अभ्यागत कक्ष : 186