उपराष्ट्रपती कार्यालय

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या देशवासीयांना शुभेच्छा

Posted On: 03 NOV 2021 6:20PM by PIB Mumbai

 

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी  देशवासीयांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांचा संपूर्ण संदेश पुढीलप्रमाणे -

"देशवासीयांना दिवाळीच्या म्हणजेच दीपोत्सवाच्या मंगल दिनाच्या  माझ्याकडून शुभेच्छा.

पारंपारिकरित्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाणारी दीपावली ही श्रीरामांनी वनवास संपवून सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासमवेत अयोध्येला परतण्याच्या  आनंदाशी निगडित आहे.

दुष्ट प्रवृत्तींवर  चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण  श्रीरामांच्या जीवनातील महान आदर्शांवरील आपला विश्वास दृढ करतो.

श्रीराम म्हणजे आपल्या परंपरेतील सत्य, धर्म, धैर्य आणि करुणेचे अवतार आहेत. या मर्यादा पुरुषोत्तमाचे  आदर्श राजा, आज्ञाधारक पुत्र, अजिंक्य योद्धा आणि सर्वांसाठी आदर्श म्हणून पूजन केले जाते.

दीपावलीच्या उत्सवात समृद्धीची देवता म्हणून माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

प्रकाश, सुसंवाद, समृद्धी आणि शांतता घेऊन येणाऱ्या या उत्सवामुळे आपल्या जीवनात नवा उत्साह निर्माण होऊन  ते परिपूर्ण होवो आणि प्रत्येकाच्या सभोवताली आनंद भरून राहो."

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769252) Visitor Counter : 149