पंतप्रधान कार्यालय
युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत भेट
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2021 9:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष श्री. वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि प्रादेशिक घडामोडींसंदर्भात विचारविनिमय केला.
उभय देशांनी कोविड लसीकरण प्रमाणपत्रांना परस्पर मान्यता देण्यासह महामारीच्या काळात केलेल्या सहकार्यासंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कोविड महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्याच्या मानवतावादी कार्याबद्दल राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे आभार मानले.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील लोकांचे असलेले परस्परांशी संबंध, विशेषत: युक्रेनच्या विविध विद्यापीठांमध्ये मोठ्या संख्येने शिकत असलेलया भारतीय विद्यार्थ्यांमधील दृढ संबंधांचे सकारात्मक मूल्यमापन केले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सज्जतेचा पुनरुच्चार केला.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1769047)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam