कोळसा मंत्रालय

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोल इंडिया लिमिटेडला वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 18 दिवसांचा कोळसा साठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले


2024 पर्यंत एक अब्ज टन कोळसा उत्पादन उद्दिष्ट गाठण्यासाठी धोरण आखायला सांगितले

Posted On: 01 NOV 2021 6:09PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि तिच्या उपकंपन्यांना या वर्षी नोव्हेंबर  अखेर पर्यंत  औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये किमान 18 दिवसांचा कोळसा साठा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कोल इंडिया लिमिटेडच्या 47 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना जोशी यांनी सीआयएलला  2024 वर्ष अखेरपर्यंत एक अब्ज टन उत्पादन गाठण्याचे आवाहन केले. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना  सुधारित उद्दिष्टे आणि तपशीलवार धोरण तयार करण्याचे निर्देश दिले.

आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमती अलीकडेच तिप्पट वाढ झाली आहे. ज्यामुळे भारतातील कोळशाच्या आयातीत 38 टक्के घट झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.  त्याच वेळी, विजेची मागणी 24 टक्क्यांहून अधिक वाढली आहे, जे मजबूत आर्थिक विकासाचे सूचक आहे. सीआयएलच्या समर्पित मनुष्यबळाची प्रशंसा करताना, प्रल्हाद जोशी यांनी देशाच्या विविध भागांतील कोळसा खाणींना त्यांनी अलिकडेच दिलेल्या  भेटींची आठवण सांगितली. ते म्हणाले की, कोविड-19 मुळे लॉकडाऊनच्या दिवसांमध्येही कोळसा योद्ध्यांनी देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अहोरात्र  काम केले.

कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी स्थापना दिन आणि पुरस्कार सोहळ्याला व्हर्च्युअली  संबोधित करताना देशात उपलब्ध असलेल्या प्रचंड कोळशाच्या साठ्याचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. कोविड-19 महामारीच्या काळात विशेषत: सामाजिक जबाबदारी क्षेत्रात केलेल्या अलिकडच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि प्रयत्नांबद्दल त्यांनी सीआयएलचे अभिनंदन केले.

आज सीआयएलचे मुख्यालय कोलकाता येथे आयोजित 47 व्या स्थापना दिनाच्या समारंभात, कोल इंडियाचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक  प्रमोद अग्रवाल यांनी सुरक्षा, पर्यावरण व्यवस्थापन, कोळसा उत्पादन आणि सीएसआर उपक्रम इत्यादी विविध श्रेणीतील कॉर्पोरेट पुरस्कार कोळसा कंपन्यांना प्रदान केले.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768593) Visitor Counter : 215