आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या नवोन्मेष आणि उद्योजकता इनक्युबेशन केंद्राचे आयुष मंत्री उदघाटन करणार
Posted On:
26 OCT 2021 11:17AM by PIB Mumbai
केंद्रीय आयुष ,बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल, दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या नवोन्मेष आणि उद्योजकता इनक्युबेशन केंद्राचे (इनक्युबेशन सेंटर फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप ,AIIA- iCAINE) उदघाटन करणार आहेत. 6 व्या आयुर्वेद दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, ‘पोषणसाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर आधारीत या कार्यक्रमात आयुष आणि महिला आणि बाल विकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई कालूभाई मुंजपारा हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयुष क्षेत्रातील स्टार्ट-अप उद्योग- व्याप्ती आणि संधी (स्टार्ट-अप्स- स्कोप अँड अपॉर्च्युनिटीज AYUR-UDYAMAH)" या विषयावर दिनांक 30 ऑक्टोबर रोजी "एक राष्ट्रीय चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देशभरातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सुमारे 400 आयुष संस्था आणि एआयआयएच्या सहकार्याने काम करणारे सामंजस्य करार भागीदार सहभागी होतील.
शैक्षणिक ज्ञानाचा लाभ घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद संस्थेने नवीन युगातील उपक्रमांचा समूह तयार करण्यासाठीआपल्या आवारामध्ये एक इनक्युबेशन केंद्र (इनक्यूबेशन आणि इनोव्हेशन सेंटर) स्थापन केले आहे. अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेला( AIIA) भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) अंतर्गत यजमान संस्था (HI) म्हणून मान्यता देण्यात आली आहे, जी नवोदितांना त्यांच्या कल्पना विकसित करण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी संधी प्रदान करेल.
याव्यतिरिक्त, अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेने, 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारे 'बाल रक्षा किट' विकसित केले आहे, ज्याचा शुभारंभ या कार्यक्रमात केला जाईल.यंदा आयुर्वेद दिनानिमित्त 10,000 बाल रक्षा किटचे वाटप केले जाणार आहे .
अन्न क्षेत्रातील आयुर्वेदाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी आयुर्वेदिक अन्नपदार्थांचे प्रदर्शन (आयुर्वेद फूड एक्स्पो) हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल, ज्यात विविध नाविन्यपूर्ण पाककृती उदाहरणार्थ खाण्याचे तयार पदार्थ आणि काही इतर वस्तू ठेवण्यात येतील..
आयुर्वेदाच्या विविध हितसंबंधितांना एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी हे प्रदर्शन एक आदर्श व्यासपीठ म्हणून काम करेल.
या कार्यक्रमात आयुष विभागीय कौशल्य परीषदेच्या (HSCC) आयुष उप विभागीय कौशल्य परीषदेच्या(आयुष सब सेक्टर हेल्थ स्किल कौन्सिल ), अंतर्गत येणाऱ्या पात्रता संचाचा शुभारंभ करण्यात येईल.
*********
Jaydevi PS/ SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766547)
Visitor Counter : 219