युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी फिफाचे सीईओ यौरी जोरकाएफ यांची भेट घेतली
विविध कार्यक्रम आणि स्पर्धांच्या आयोजन विकासातून मूलभूत पातळीवर फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्याबाबत केली चर्चा
Posted On:
25 OCT 2021 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे फिफाचे सीईओ यौरी जोरकाएफ यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी फुटबॉल खेळाला मूलभूत पातळीवर प्रोत्साहन देणे तसेच अधिकाधिक प्रमाणात स्पर्धा आणि कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे या खेळाचा विकास घडवून आणण्याबाबत चर्चा केली. भारतात आता खेळांविषयी अधिकाधिक रुची निर्माण होत असून त्याचा परिणाम टोक्यो इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशातून दिसून येतो असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. देशात क्रीडा संस्कृती उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने देखील गेल्या काही आठवड्यांमध्ये नव्या घडामोडींना वेग आला आहे असे ते म्हणाले.
यावेळी यौरी यांनी ठाकूर यांना फुटबॉल खेळातील त्यांच्या जगप्रसिध्द क्लुप्त्या दाखविल्या तर ठाकूर यांनी देखील त्यांच्या ड्रिब्लिंग कौशल्याची झलक यौरी यांना दाखविली.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766434)
Visitor Counter : 213