रसायन आणि खते मंत्रालय
“औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रातील संधी आणि भागीदारी” या विषयावरील गुंतवणूकदारांच्या परिषदेला डॉ. मनसुख मांडवीय करणार संबोधित
येत्या काही वर्षात, वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्राची उलाढाल सध्याच्या 11 अब्ज डॉलर्स वरुन 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल
वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादन-संलग्न-सवलत योजनेसाठी 13 कंपन्यांची या आधीच निवड
Posted On:
25 OCT 2021 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे या क्षेत्रांत, जागतिक पातळीवर भारताची स्थिती अधिक भक्कम करण्याच्या दूरदृष्टी नियोजनाचा भाग म्हणून, औषधनिर्माण विभाग, ‘इन्व्हेस्ट इंडिया’सोबत भागीदारी करुन येत्या 27 ऑक्टोबर 2021 रोजी गुंतवणूकदारांची एक परिषद आयोजित केली आहे. सकाळी 10 ते दुपारी साडे चार वाजेपर्यंत ही परिषद चालणार आहे.
या शिखर परिषदेची मूळ संकल्पना, “औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रातल्या संधी आणि भागीदारी” अशी आहे. या शिखर परिषदेमुळे, सर्व उद्योग सहभागी उद्योजकांना या संकल्पनेवर आधारित तंत्रज्ञानविषयक पाच सत्रांमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
- औषधनिर्माण क्षेत्राचा विचार केल्यास, हे सत्र, जैव-औषधक्षेत्रातील संशोधन विषयक उत्पादनांविषयी चर्चा होणार आहे. यात, जीवशास्त्र/ बायोसिमिलर्स, पेशी आणि जीन उपचार, तसेच लस उत्पादन क्षमता वाढवणे इत्यादी. औषधनिर्माण क्षेत्रासाठीची उत्पादन-संलग्न-सवलत योजना सुरु करण्यात येऊन, त्या अंतर्गत, 15000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे 278 कंपन्यांनी आवेदने भरली आहेत.
- वैद्यकीय उपकरण क्षेत्राशी संबंधित सत्रात, वैद्यकीय उपकरणाच्यां क्षेत्रात भारतासाठी असलेल्या संधी कशा विकसित करता येतील, यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच, या क्षेत्रातील आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून महत्वाचे मार्गदर्शन या परिषदेत केले जाण्याची अपेक्षा आहे.वैद्यकीय उपकरण क्षेत्र, हे आज उदयोन्मुख क्षेत्र मानले जात असून, सध्या या क्षेत्राची उलाढाल 11 अब्ज डॉलर्स असून, येत्या कांही दिवसांत, 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोचण्याची त्याची क्षमता आहे. 13 कंपन्यांना या आधीच, उत्पादन-संलग्न-सवलत योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे, देशांतर्गत बाजारात निश्चित उपकरणांच्या गुंतवणुकीला पाठबळ मिळणार आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766316)
Visitor Counter : 228