वस्त्रोद्योग मंत्रालय
पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जिओ-टेक्स्टाईल प्रकारच्या वस्त्रांच्या वापरासाठी तंत्रज्ञानाची जाण असणारे कर्मचारी नेमण्यास अथवा रचना कौशल्य शिकण्यास मंजुरी
Posted On:
25 OCT 2021 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने रस्ते, महामार्ग, रेल्वे, पाणी स्त्रोत यांच्या संदर्भातील पायाभूत प्रकल्पांमध्ये जिओ-टेक्स्टाईल अर्थात भू-कृत्रिम प्रकारच्या वस्त्रांच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची जाण असणारे कर्मचारी नेमण्यास अथवा रचना कौशल्य शिकण्यासाठीच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. बेंगळूरू येथील भारतीय शास्त्रीय संस्था, चेन्नईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था या तिन्ही संस्थांमध्ये हा प्रकल्प एकाच वेळी सुरु करण्यात येईल. संबधित अभियांत्रिकी क्षेत्रातील समन्वयक प्राध्यापक त्या त्या संस्थांतील संबंधित केंद्र अथवा कार्यालये यांच्याशी चर्चा करून या विशेष अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीची काळजी घेतील.
या अभ्यासक्रमासाठी एका तुकडीत कमीतकमी 75 आणि जास्तीत जास्त 100 विद्यार्थी असतील. प्रायोगिक पातळीमध्ये वरील तिन्ही संस्थांच्या प्रत्येकी 2 तुकड्या तयार करण्यात येतील. या संस्था ना-नफा,ना-तोटा तत्वावर या अभ्यासक्रमांचे संचालन करणार आहेत.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, स्वतःच्या जबाबदारीची पूर्तता म्हणून प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या इतर संबंधित विभागांशी समन्वय साधणार आहे.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766309)
Visitor Counter : 243