गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड -19 प्रतिबंधक देशव्यापी लसीकरणात 100 कोटीचा गाठलेला टप्पा हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा
"आज, भारताने नरेंद्र मोदीं यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाद्वारे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचे100 कोटींहून अधिक मात्रांचे लक्ष्य साध्य करून एक विक्रम प्रस्थापित केला असून जगाला नवीन भारताच्या अफाट क्षमतांची पुन्हा ओळख करून दिली आहे "
"या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मी देशाचे अभिनंदन करतो आणि सर्व वैज्ञानिक, संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी अनेक आव्हानांवर मात करून या महान कार्यात योगदान दिले आणि प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षा आणि आरोग्याप्रति वचनबद्धतेबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो"
Posted On:
21 OCT 2021 2:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2021
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 100 कोटी लोकांना कोविड -19 प्रतिबंधक लस दिल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे. हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असल्याचे ते म्हणाले.
अमित शहा यांनी ट्विटच्या संदेशात म्हटले आहे की “ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ! आज, भारताने नरेंद्र मोदीं यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाद्वारे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचे 100 कोटींहून अधिक मात्रांचे लक्ष्य साध्य करून एक विक्रम प्रस्थापित करून संपूर्ण जगाला नवीन भारताच्या अफाट क्षमतांची पुन्हा एकदा ओळख करून दिली आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात देशातील सर्व वैज्ञानिक , संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "मी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशाचे अभिनंदन करतो आणि सर्व वैज्ञानिक, संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो , ज्यांनी अनेक आव्हानांवर मात करून या महान कार्यात योगदान दिले आणि प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा आणि आरोग्याप्रति वचनबद्धतेबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो".
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765436)
Visitor Counter : 246