पंतप्रधान कार्यालय
केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाबद्दल पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
Posted On:
17 OCT 2021 5:44PM by PIB Mumbai
केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.
"केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला आणि केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली.जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन घटनास्थळांवर कार्यरत आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांनी आपला जीव गमावला हे दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोकभावना" असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764544)
Visitor Counter : 246
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam