आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 97.23 कोटी मात्रा देण्यात आल्या
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.08% आहे; मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर
गेल्या 24 तासांत देशात 15,981 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,01,632) एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.59 %
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.44%) गेले 113 दिवस 3% पेक्षा कमी
Posted On:
16 OCT 2021 5:57PM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 8,36,118 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने 97.23 कोटी मात्रांचा (97,23,77,045) टप्पा पार केला आहे. देशभरात 96,05,482 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.
HCWs
|
1st Dose
|
1,03,75,703
|
2nd Dose
|
90,68,232
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,61,275
|
2nd Dose
|
1,54,90,253
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
39,14,51,891
|
2nd Dose
|
10,85,40,506
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
16,73,04,569
|
2nd Dose
|
8,53,97,182
|
Over 60 years
|
1st Dose
|
10,55,20,693
|
2nd Dose
|
6,08,66,741
|
Total
|
97,23,77,045
|
गेल्या 24 तासांत 17,861 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,33,99,961 झाली आहे.
परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.08% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 111 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासांत,15,981 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. गेल्या 8 दिवसांपासून नवीन रुग्णसंख्या 20,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे.
देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,01,632 इतकी आहे आणि ही गेल्या 218 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.59% आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 9,23,003 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत सुमारे 59 कोटी (58,98,35,258) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.73% असून गेले 113 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.73% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 47 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 130 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764375)
Visitor Counter : 242