पंतप्रधान कार्यालय
सात नव्या संरक्षण कंपन्यांच्या राष्ट्रार्पण समारंभात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2021 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2021
विजयादशमीच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधत, उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12:10 वाजता, संरक्षण मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात सात संरक्षण कंपन्यांचे राष्ट्रार्पण केले जाणार आहे. विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण उद्योगांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
सात नव्या संरक्षण कंपन्यांविषयी माहिती:-
केंद्र सरकारने आयुध निर्माणी मंडळाचे,100 टक्के सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी, देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात, आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कार्यान्वयन स्वायत्तता वाढवली जाईल, कार्यक्षमताही वाढेल आणि विकास तसेच नवोन्मेषाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
ज्या सात संरक्षण कंपन्यांचे कोर्पोरेटीकरण केले जाणार आहे, त्यांची नावे- म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL),आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI), ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE India); ट्रूप कम्फर्ट लिमिटेड (TCL); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL); इंडिया ओप्टेल लिमिटेड (IOL); आणि ग्लाईडर्स इंडिया लिमिटेड (GIL) अशी आहेत.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1763992)
आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Malayalam
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada