युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात महिनाभर चालणारी “स्वच्छ भारत मोहीम” पूर्ण भरात


मोहिमेमध्ये 25 हून अधिक प्रमुख वारसा स्थळांचा समावेश

Posted On: 13 OCT 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑक्टोबर 2021

 

'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून युवा कल्याण  आणि क्रीडा मंत्रालय  ऐतिहासिक आणि प्रसिद्ध  तसेच धार्मिक स्थळांसह देशभरात स्वच्छ भारत मोहीम राबवत आहे. मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेसाठी 25 हून अधिक प्रसिद्ध  वारसा स्थळे निवडली आहेत, जिथे नेहरू युवा केंद्र संगठन  आणि एनएसएसचे स्वयंसेवक पर्यटन स्थळांच्या आसपास स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवत आहेत.  

या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत, गुवाहाटीचे कामाख्या मंदिर, गयाचे महाबोधी मंदिर, अहमदाबाद येथील साबरमती आश्रम, जम्मूचे अमर महल पॅलेस, कर्नाटकचे हम्पी, मध्य प्रदेशचे खजुराहो, ओडिशाचे पुरी मंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, अमृतसरचे सुवर्ण मंदिर/  जालियनवाला बाग, लखनौचे रुमी दरवाजा आणि हरिद्वार येथील हर कि पौडी या प्रसिद्ध  ठिकाणी स्वच्छ भारत मोहीम आयोजित केली जात आहे.

   

(Cleanliness Drive at Golconda Fort, Hyderabad)

   

(Clean India Drive at Meenakshi Temple , Madurai)

  

Cleanliness Drives at temples of Mandya

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763672) Visitor Counter : 325