राष्ट्रपती कार्यालय

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश

Posted On: 12 OCT 2021 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे:-

दुर्गा पूजेच्या या मंगल प्रसंगी, मी देशात आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिक बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. 

दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक आहे आणि नारी-शक्तीचे एक दैवी रूप देखील आहे. दुर्गा पूजा म्हणजे दुष्ट शक्तींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचा उत्सव आहे. दुर्गा मातेची नऊ वेगवेगळी रूपे जीवन आणि निसर्ग यांच्या एकत्रीकरणाच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात.

या उत्सवी पर्वावर, स्त्रियांना पूर्वीपेक्षा अधिक सन्मान देईल आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेमध्ये समान सहभाग देऊ शकेल असा समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया.

ह्या आनंदी सणानिमित्त नागरिकांमध्ये शांतता, बंधुत्व आणि ऐक्याची उर्जा निर्माण होवो आणि आपल्या देशाची सेवा आणि प्रगती साधण्याप्रती आपण स्वतःला पुन्हा समर्पित करू शकू अशी प्रार्थना मी देवाकडे करतो,

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763273) Visitor Counter : 229