पंतप्रधान कार्यालय
महामहीम फुमिओ किशिदा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
Posted On:
08 OCT 2021 5:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम फुमिओ किशिदा यांच्याशी बातचीत केली असून जपानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले;
“जपानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी महामहीम फुमिओ किशिदा यांच्याशी बातचीत केली आहे. भारत आणि जपान यांच्यादरम्यानची वैशिष्ट्यपूर्ण धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या तसेच हिंद-प्रशांत प्रदेशात सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने फुमिओ यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762199)
अभ्यागत कक्ष : 162
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam