ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खरीप विपणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीचा आतापर्यंत सुमारे 30,000 शेतकऱ्यांना फायदा


हरयाणामध्ये 1,46,509 मेट्रिक टन तर पंजाबमध्ये 1,41,043 मेट्रिक टन धान खरेदी

5 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 2,87,552 मेट्रिक टन धानाची खरेदी

Posted On: 06 OCT 2021 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्टोबर 2021

 

खरीप विपणन हंगाम 2021-22 साठी धान खरेदी नुकतीच सुरू झाली असून गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील ही खरेदी एमएसपीनुसार केली जात आहे. 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 2,87,552 मेट्रिक टन धानाची खरेदी एमएसपीनुसार करण्यात आली आहे. 29,907 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असून त्यांना एमएसपीनुसार 563.60 कोटी रुपयांचा चुकारा देण्यात आला आहे. एकूण खरेदीपैकी हरयाणामधून 1,46,509 मेट्रिक टन तर पंजाबमधून 1,41,043 मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे.

2020-21 च्या खरीप हंगामातील धान खरेदी 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 894.24 लाख मेट्रिक टन (खरीप पीक 718.09 लाख मेट्रिक टन आणि रब्बी पीक 176.15 लाख मेट्रिक टन) खरेदीने जवळजवळ पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही खरेदी 768.70 लाख मेट्रिक टन होती. 2020-21 च्या हंगामात 131.14 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आणि त्यांना किमान हमी भावाने 1,68,832.78 कोटी रुपये चुकते करण्यात आले होते. 2019-20 च्या हंगामातील 770.93 लाख मेट्रिक टनाच्या सर्वोच्च पातळीला मागे टाकणारी ही खरेदी होती.

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761563) Visitor Counter : 238