माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रोत्सव साजरा करा प्रसारभारतीसह


सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम, थेट प्रसारण आणि बरेच काही

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2021 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

सणांच्या हंगामाच्या प्रारंभी लोक नवरात्रीच्या उत्सवासाठी सज्ज होत आहेत. प्रसारभारती नेटवर्क उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्याकरता तुमच्यासाठी विशेष कार्यक्रम, थेट प्रसारण आणि बरेच काही घेऊन येत आहे. तुमच्या उत्सवाचा एक भाग होण्यासाठी, दूरदर्शन आणि आकाशवाणी बरेचसे - भक्ती आणि मनोरंजनपर आकर्षक कार्यक्रम प्रसारित करणार आहे.

नवरात्रीच्या संपूर्ण काळात, दूरदर्शन आपल्यासाठी देशभरातील विविध ठिकाणांहून दुर्गा पूजा आणि आरतीचे थेट प्रसारण दाखवणार आहे. यामध्ये कोलकात्यातील प्रसिद्ध 'महालय' आणि तिरुपतीतील श्री वेंकटेश्वरस्वामी नवरात्री ब्रह्मोत्सवम यांचा समावेश आहे. तुम्ही दूरदर्शनवर अयोध्या इथून अयोध्या की रामलीला थेट पाहू शकता. 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान, रामचरितमानसचे दररोज 2 भाग डीडी नॅशनलवर प्रसारित केले जातील.

Name of the Programme

 

Period

 

Time

Aarti - Live from Chattarpur Mandir

From 6th – 15th Oct 2021

06.00

Aarti - Live from Jhandewalan Mandir

From 6th – 15th Oct 2021

06:30

Mahalaya from Kolkata

On 6th Oct 2021

07.00 to 08.00

Kumkuma Puja and Alankaram of Kanaka Durga Devi - Live from Vijayawada

      From 7th - 11th Oct 2021

07.00

Durga Puja Live from Kolkata

From 12th - 15th Oct 2021

06.30  to

08.00

Ramcharitmanas - 2 episodes

    From 6th- 15th Oct 2021

08:00

Shri Venkateswara Swamy Navratri Brahmotsavams – Live from Tirupati

    From 8th- 15th Oct 2021

09:00

Ramcharitmanas - 2 episodes

    From 6th – 15th Oct 2021

14:00

Repeat of Morning Aarti of Jhandewalan and Chattarpur Mandir

From 6th – 15th Oct 2021

15.00

Feature films on the occasion of Durgotsav

From 8th – 15th Oct 2021

16.00

 Ayodhya ki  Ramleela - Live from Ayodhya

From 6th – 15th Oct 2021

19.00

to 22.00

देशभरातील आकाशवाणीच्या व्यापक विशाल नेटवर्कच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून नवरात्री विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. 6 ऑक्टोबर रोजी महालयाच्या निमित्ताने इंद्रप्रस्थ, एफएम गोल्ड आणि आकाशवाणी बातम्या 24*7 वर सकाळी 4 ते 5:30 या वेळेत हिंदी/संस्कृतमध्ये विशेष कार्यक्रम ‘महिषासुरमर्दिनी’ प्रसारित केला जाईल. 'महिषासुरमर्दिनी'ची बंगाली आवृत्ती एफएम रेनबो नेटवर्क आणि राजधानी वाहिनीवर प्रसारित केली जाईल.

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील हे सर्व दृकश्राव्य कार्यक्रम प्रसारभारतीच्या न्यूजऑनएअर ॲपवर उपलब्ध असतील आणि आमच्या यूट्यूब चॅनेलवर याचे थेट-प्रसारण देखील होईल.

NewsOnAir ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा - दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील सर्व नवरात्री संबंधित कार्यक्रमांसाठी आणि प्रसारणासाठी एकमेव ठिकाण.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1761176) आगंतुक पटल : 317
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Telugu