आदिवासी विकास मंत्रालय
कॅनडामध्ये भारतीय आदिवासी कला आणि हस्तकलांना मिळणार प्रोत्साहन
कॅनडातील भारतीय दूतावासात TRIFED चे आत्मनिर्भर दालन
Posted On:
02 OCT 2021 4:21PM by PIB Mumbai
गांधी जयंतीनिमित्त आज, कॅनडातील ओटावा येथील भारतीय दूतावासात भारतातील उत्कृष्ट जीआय-टॅग असलेल्या आदिवासी कला आणि हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
TRIFED अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास मंडळाद्वारे प्रोत्साहित केलेल्या आत्मनिर्भर दालनाचे उद्घाटन कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त श्री अजय बिसारिया यांनी केले. या दालनात आदिवासी हस्तकला आणि उत्पादनांचे नमुने, उत्पादनांची सूची आणि साहित्य तसेच कॅनडामध्ये अशा उत्पादनांच्या व्यावसायिक खरेदी आणि वितरणाविषयी माहिती उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे भारतातील आदिवासी कारागीरांना कॅनडाच्या बाजाराशी जोडण्यास मदत होईल.
भारतातील आदिवासी शतकानुशतके तयार करत असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास मंडळाच्या (TRIFED) सहकार्याने, जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून दूतावासातील 'आत्मनिर्भर भारत' दालन उभारण्यात आले आहे.
10, स्प्रिंगफिल्ड रोड, ओटावा येथील दूतावासाच्या ऐतिहासिक पिल्लई मेमोरियल कॉन्सुलर हॉलमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण आदिवासी हस्तकला लोकांना पाहण्यासाठी हे दालन कार्यरत राहील.
दूतावासाच्या व्यावसायिक शाखेकडे (hciottawa.gov.in) व्यावसायिक चौकशी करता येईल.
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760413)
Visitor Counter : 256