पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांनी जल जीवन अभियानासंदर्भात ग्रामपंचायत आणि पाणी समित्यांशी साधला संवाद


पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अॅप आणि राष्ट्रीय जल जीवन कोषचे केले लोकार्पण

“जल जीवन मिशन ही विकेंद्रीकरणाची एक मोठी चळवळ.  ही आहे गावे आणि-महिलांद्वारे संचालित चळवळ.  त्याचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग आहे. ”

नळाचे पाणी लोकांपर्यत पोहचवण्यासाठी "फक्त दोन वर्षात, सात दशकांपेक्षा जास्त काम झाले"

“गुजरातसारख्या राज्यातून मी आलोय, मी दुष्काळसदृश परिस्थिती पाहिली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व मला समजले आहे.  म्हणूनच, गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारण ही माझी प्रमुख प्राथमिकता होती."

"आज, देशातील सुमारे 80 जिल्ह्यांतील सुमारे सव्वा लाख गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचत आहे"

"महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये नळ जोडणीची संख्या 31 लाखांवरून 1.16 कोटी झाली आहे"

"प्रत्येक घरात आणि शाळेत शौचालये, परवडणारे सॅनिटरी पॅड, बाळंतपणात पोषण सहाय्य आणि लसीकरणासारख्या उपायांनी 'मातृशक्ती' बळकट केली आहे'

Posted On: 02 OCT 2021 1:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जल जीवन मिशन संदर्भात ग्राम पंचायत आणि पाणी समित्या / ग्राम पाणी आणि स्वच्छता समित्यांशी (VWSC) संवाद साधला.  त्यांनी भागधारकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि मिशन अंतर्गत योजनांमधे अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना दृढ करण्यासाठी जल जीवन मिशन अॅपचे लोकार्पण  केले.  त्यांनी राष्ट्रीय जल जीवन कोष देखील सुरू केला, जिथे कोणतीही व्यक्ती, संस्था, महामंडळ किंवा समाजसेवी संस्था, मग ती भारतात असो किंवा परदेशात, प्रत्येक ग्रामीण घर, शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नळपाणी जोडणी देण्यासाठी मदत करू शकते.  ग्रामपंचायत आणि पाणी समितीच्या सदस्यांसह केंद्रीय मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत, श्री प्रल्हाद सिंह पटेल, श्री बिश्वेश्वर टुडू, राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यावेळी उपस्थित होते.

समित्यांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील उमरी गावाचे श्री गिरिजाकांत तिवारी यांच्याकडे त्यांच्या गावात जल जीवन मिशनचा कसा  प्रभाव आहे याबद्दल चौकशी केली.  आता सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध आहे आणि यामुळे गावातील महिलांचे जीवन सुधारले आहे अशी माहिती श्री तिवारी यांनी दिली.

पंतप्रधानांनी श्री तिवारी यांना विचारले की त्यांच्या गावकऱ्यांना विश्वास वाटला होता का की त्यांना पाईपद्वारे पाणी जोडणी मिळेल आणि त्यांना आता कसे वाटतेश्री तिवारी यांनी मिशनसाठी गावात सुरु असलेल्या  सामूहिक प्रयत्नांविषयी सांगितले.  श्री तिवारी यांनी माहिती दिली की गावात प्रत्येक घरात शौचालय आहे आणि प्रत्येकजण त्यांचा वापर करत आहे.  पंतप्रधानांनी बुंदेलखंडच्या ग्रामस्थांचे त्यांच्या या कार्याला वाहून घेण्याबद्दल कौतुक केले आणि सांगितले की, पीएम आवास, उज्ज्वला आणि जल जीवन मिशन सारख्या योजनांद्वारे महिला सशक्त होत आहेत आणि त्यांना योग्य सन्मान मिळत आहे.

पंतप्रधानांनी गुजरातच्या पिपली येथील  रमेशभाई पटेल यांना त्यांच्या गावातील पाण्याच्या उपलब्धतेबद्दल विचारले. तसेच पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते का, असा प्रश्नही विचारला.  रमेशभाईंनी सांगितले   की गुणवत्ता चांगली आहे आणि गावातील महिलांना गुणवत्ता तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे असे सांगितले. पंतप्रधानांनी विचारले की लोकांना  पिण्याच्या पाण्यासाठी पैसे द्यावे लागतात   कारमेशभाई  म्हणाले की  पाण्याचे मूल्य गावांना अगदी चांगले ठाऊक  आहे आणि त्यासाठी पैसे देण्याची तयारी आहे. पंतप्रधानांनी पाणी वाचवण्यासाठी स्प्रिंकलर्स  आणि ठिबक सिंचन वापराविषयी विचारले. गावात नाविन्यपूर्ण सिंचन तंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन  2.0 संदर्भात सांगितले की, लोकांनी स्वच्छतेसाठी  मोहिमेला भरघोस पाठिंबा दिला आहे आणि जल जीवन अभियानालाही असेच  यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या  कौशल्या रावत यांच्याकडे   जल जीवन अभियानापूर्वी आणि  नंतर पाण्याच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली.  जल जीवन अभियाना द्वारे पाणी  उपलब्ध झाल्यानंतर पर्यटक त्यांच्या गावात येऊ लागले आहेत आणि होमस्टेमध्ये राहू लागले आहेत, असेही त्यांनी  सांगितले. रावत यांनी माहिती दिली की त्यांच्या गावात सर्वांचे लसीकरण पूर्ण  झाले आहे. वनीकरण , पर्यटन  आणि होमस्टे सुधारणा सारख्या शाश्वत पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे  आणि गावाचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या वेलेरी येथे राहणाऱ्या  सुधा यांना  जल जीवन अभियानाच्या  प्रभावाबद्दल विचारले. अभियानानंतर सर्व घरांना पाइपद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी मिळाली  आहे असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांनी त्यांच्या  गावातील जगप्रसिद्ध आर्नी  रेशीम साडी उत्पादनाची चौकशी केली. पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या जोडणीमुळे  इतर घरगुती कामांसाठी वेळेची बचत झाली  आहे का, असेही पंतप्रधानांनी विचारले.  सुधा यांनी माहिती दिली की पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्यांचे जीवन सुधारले आहे आणि त्यांच्याकडे इतर उत्पादक कामांसाठी वेळ आहे. गावात  पावसाचे पाणी वाचवण्यासाठी धरण , तलाव इत्यादींची बांधणी,सारख्या  उपक्रमांची त्यांनी माहिती दिली .   लोकांकडून जल जीवन  अभियानाचा स्वीकार हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मणिपूरच्या  लायथेनथेम सरोजिनी देवी  यांच्याशी संवाद साधतानामोदींना माहिती देण्यात आली की पूर्वी  पाणी फक्त लांबच्या ठिकाणी उपलब्ध होते आणि लांब रांगा लागायच्या.  आता परिस्थिती सुधारली आहे कारण सर्व घरांमध्ये पाईपद्वारे पाणी पुरवठा होत आहे. गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त   बनल्यामुळे  गावात  आरोग्य सुधारले  आहे असे त्यांनी सांगितले.  आपल्या  गावामध्ये पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी करणे हा एक नियम बनला आहे  आणि त्यासाठी पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले.  लोकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडे खरा बदल घडत असल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की गावे ही बापू आणि लाल बहादूर शास्त्रीजींच्या हृदयाचा भाग होती.  त्यांनी आनंद व्यक्त केला की, आजच्या  दिवशी देशभरातील लाखो गावांतील लोक ग्राम  सभेच्या स्वरूपातजल जीवन संवाद आयोजित करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, जल जीवन मिशनमागची कल्पना  केवळ लोकांना पाणी उपलब्ध करून देणे नाही. ही विकेंद्रीकरणाचीही  मोठी चळवळ आहे. ही एक गाव-प्रणित -महिला-प्रणित चळवळ आहे.  त्याचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग आहे. 'ग्राम स्वराज'चा खरा अर्थ आत्मविश्वासाने भरलेला असणे असे गांधीजी सांगत असत, असे पंतप्रधान म्हणाले.  "म्हणूनच माझा सातत्याने प्रयत्न आहे की ग्राम स्वराजची ही विचारसरणी पूर्णत्वाच्या दिशेने पुढे गेली पाहिजे," असे पंतप्रधान म्हणाले.  मोदींनी गुजरातचे  मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात ग्राम स्वराजसाठी केलेल्या उपाययोजनांची आठवण सांगितली. यात  ओडीएफ गावांसाठी निर्मल गाव, गावातील जुन्या  विहिरी पुनरुज्जीवित करण्यासाठी जलमंदिर अभियान , गावांमध्ये 24 तास विजेसाठी ज्योतिग्राम, सौहार्दासाठी तीर्थ ग्राम गावे, गावांमध्ये ब्रॉडबँडसाठी ई-ग्राम यांचा यात समावेश होता. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी योजनांचे नियोजन आणि व्यवस्थापनात स्थानिक समुदायांना सामील करण्यासाठी काम केले असे ते म्हणाले. . त्यांनी सांगितले की यासाठी, विशेषतः पाणी आणि स्वच्छतेसाठी, 2,5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. अधिकारांबरोबरच पंचायतींच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. जल जीवन मिशन आणि पाणी समित्या केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज्यासाठीच्या वचनबद्धतेचे एक प्रमुख उदाहरण आहेत, असे ते म्हणाले.

पाण्याच्या समस्येच्या लोकप्रिय संकल्पनांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी चित्रपट, कथा, कवितांविषयी सांगितले ज्यात  गावातील स्त्रिया आणि मुले पाणी आणण्यासाठी कित्येक मैल चालत जायचे याविषयी सांगितले आहे. . काही लोकांच्या मनात, गावाचे नाव घेताच हे चित्र डोळ्यासमोर  येते. पंतप्रधानांनी विचारले की इतके कमी लोक या समस्येबाबत  का विचार करतात: या लोकांना दररोज  नदी किंवा तलावावर  का जावे लागतेया लोकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही? मला वाटते की ज्यांच्याकडे दीर्घ काळ धोरणनिर्मितीची जबाबदारी होती त्यांनीअसे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या समस्येच्या लोकप्रिय संकल्पनांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी चित्रपट, कथा, कवितांविषयी सांगितले ज्यात  गावातील स्त्रिया आणि मुले पाणी आणण्यासाठी कित्येक मैल चालत जायचे याविषयी सांगितले आहे. . काही लोकांच्या मनात, गावाचे नाव घेताच हे चित्र डोळ्यासमोर  येते. पंतप्रधानांनी विचारले की इतके कमी लोक या समस्येबाबत  का विचार करतात: या लोकांना दररोज  नदी किंवा तलावावर  का जावे लागतेया लोकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही? मला वाटते की ज्यांच्याकडे दीर्घ काळ धोरणनिर्मितीची जबाबदारी होती त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा होता, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की कदाचित पूर्वीच्या धोरणकर्त्यांना पाण्याचे महत्त्व कळले नाही कारण ते  मुबलक  पाणी असलेल्या भागातून आले होते.  मोदी म्हणाले, गुजरात सारख्या राज्यातून आल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आपण पाहिली आहे आणि  पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व माहित आहे. म्हणूनच गुजरातचे मुख्यमंत्री असताना , लोकांना पाणी पुरवणे  आणि जलसंधारण याला  त्यांचे प्राधान्य होते.

पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्यापासून 2019 पर्यंत आपल्या देशात फक्त 3 कोटी घरांना नळाचे पाणी उपलब्ध होते. 2019 मध्ये जल जीवन अभियान सुरू झाल्यापासून 5 कोटी घरांना पाणी जोडणी जोडण्यात आली आहे. आज देशातील सुमारे 80 जिल्ह्यांतील सुमारे 1.25 लाख गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये नळ जोडणीची संख्या 31 लाखांवरून 1.16 कोटी झाली आहे. त्यांनी नमूद केले की गेल्या सात दशकांपेक्षा जास्त काम मागील दोन वर्षात झाले आहे.  मुबलक पाणी असलेल्या भागात हणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिकाने  पाणी वाचवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आणि त्यांना त्यांच्या सवयी देखील बदलायला सांगितल्या.

पंतप्रधानांनी देशातील मुलींचे आरोग्य आणि सुरक्षा सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  प्रत्येक घरात आणि शाळेत शौचालये, परवडणारे सॅनिटरी पॅड, बाळंतपणात  पोषण सहाय्य आणि लसीकरण यासारख्या उपायांनी मातृशक्तीबळकट केल्याचे ते म्हणाले.  गावांमध्ये बांधण्यात आलेल्या अडीच कोटी घरांपैकी बहुतांश घरे महिलांच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी दिली,

उज्ज्वला सारख्या योजनांनी  महिलांना धूराने भरलेल्या  जीवनापासून मुक्त केले आहे. महिलांना बचत गटांद्वारे आत्मनिर्भरता  मिशनमध्ये सामावून घेतले  जात आहे आणि गेल्या सात वर्षांत या गटांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. 2014 पूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या सात वर्षांमध्ये राष्ट्रीय आजीविका मिशन अंतर्गत स्त्रियांच्या मदतीमध्ये 13 पटीने वाढ झाली आहे,असेही ते म्हणाले.

 

***

G.Chippalkatti/V.Ghode/S.Kane/P.Kor



(Release ID: 1760348) Visitor Counter : 355