युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रयागराज येथून देशव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रमाची सुरुवात केली
लोकसहभागातून एका महिन्यात 75 लाख किलो कचऱ्याचे संकलन करून भारत नवा विक्रम नोंदवणार : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Posted On:
01 OCT 2021 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
महत्त्वाचे मुद्दे:
- उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशाचे हवाई उड्डाण मंत्री नंदगोपाळ गुप्त आणि केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री, आणि उत्तर प्रदेशाचे पंचायत राज मंत्री उपेंद्र तिवारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून लोकांचा कचरा सफाईतील विशेषतः एकदा वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्यातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे देशव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रमातील स्वच्छता अभियानात भाग घेतला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री उपेंद्र तिवारी, केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाच्या सचिव उषा शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील ज्येष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, स्वच्छता अभियान सुरु करण्यासाठी संगमस्थळी असलेल्या या शहरापेक्षा अधिक समर्पक स्थळ दुसरे असूच शकत नाही. येथे स्वच्छतेबद्दल दिलेला संदेश संपूर्ण देशाला प्रेरणा देईल. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी भाग घेण्याचे आवाहन अनुराग ठाकूर यांनी केले.ते म्हणाले की, “आपण देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला वसाहतवादी राजवटीपासून मुक्त केले, आता आपला तरुण वर्ग देशाला कचऱ्यापासून मुक्ती देतील.” या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या युवा स्वयंसेवकांना केंद्रीय मंत्र्यांनी प्रोत्साहन देऊन कौतुक केले.
केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले की, महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला आणि आता दीर्घकाळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छता अभियानाची देणगी दिली आहे. त्यांनी सांगितले की, या मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून 75 लाख किलो कचरा, मुख्यतः प्लॅस्टिक कचरा गोळा केला जाईल आणि नागरिकांची मदत आणि स्वयंस्फूर्त सहभागातून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.
या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी संगम परिसरात स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760147)
Visitor Counter : 263