अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सप्टेंबर 2021 मधील जीएसटी महसूल संकलन


सप्टेंबर महिन्यात एकूण 1,17,010 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित झाला

महाराष्ट्रातील सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी महसूल संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22%ची वाढ

Posted On: 01 OCT 2021 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्टोबर 2021

 

सप्टेंबर 2021 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,17,010 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 20,578 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 26,767 कोटी रुपये, आयजीएसटी 60,911 कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 29,555 कोटी रुपये) आणि अधिभार 8,754 कोटी रुपये ( यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 623 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित समझोता म्हणून आयजीएसटीमधून 28,812 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 24,140 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, सप्टेंबर 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी 49,390 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 50,907 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2021 मध्ये 23% अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 30% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 20% अधिक राहिला. सप्टेंबर 2019 मध्ये संकलित 91,916 कोटी रुपयांचा महसूल लक्षात घेतला तर यावर्षीचे महसूल संकलन गेल्या वर्षीपेक्षा 4% नी जास्त आहे.

विद्यमान वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मासिक सरासरी जीएसटी संकलन 1.15 लाख कोटी रुपये झाले आहे आणि हे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत संकलित झालेल्या 1.10 लाख कोटी रुपयांच्या एकूण मासिक सरासरी संकलनाहून 5% अधिक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल संकलन वाढविण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहील आणि या वर्षीच्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये याहून अधिक जीएसटी महसूल संकलन होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यांच्या जीएसटी महसुल संकलनात येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी 22,000 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई देखील दिली आहे.

सप्टेंबर 2020 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 13,546 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर सप्टेंबर 2021 मध्ये 16,584 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  22% ची  वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पुढील तक्त्यामध्ये सप्टेंबर 2020 मधील जीएसटी संकलनाच्या तुलनेत सप्टेंबर 2021 महिन्यातील जीएसटी महसूल संकलनाची प्रत्येक राज्यातील आकडेवारी दिली आहे -

जीएसटी महसूल संकलनातील सप्टेंबर 2021 मधील राज्यनिहाय वाढ

 


Sep-20

Sep-21

Growth

Jammu and Kashmir

368

377

3%

Himachal Pradesh

653

680

4%

Punjab

1,194

1,402

17%

Chandigarh

141

152

8%

Uttarakhand

1,065

1,131

6%

Haryana

4,712

5,577

18%

Delhi

3,146

3,605

15%

Rajasthan

2,647

2,959

12%

Uttar Pradesh

5,075

5,692

12%

Bihar

996

876

-12%

Sikkim

106

260

144%

Arunachal Pradesh

35

55

56%

Nagaland

29

30

3%

Manipur

34

33

-2%

Mizoram

17

20

16%

Tripura

50

50

0%

Meghalaya

100

120

20%

Assam

912

968

6%

West Bengal

3,393

3,778

11%

Jharkhand

1,656

2,198

33%

Odisha

2,384

3,326

40%

Chhattisgarh

1,841

2,233

21%

Madhya Pradesh

2,176

2,329

7%

Gujarat

6,090

7,780

28%

Daman and Diu

15

0

-99%

Dadra and Nagar Haveli

225

304

35%

Maharashtra

13,546

16,584

22%

Karnataka

6,050

7,783

29%

Goa

240

319

33%

Lakshadweep

1

0

-51%

Kerala

1,552

1,764

14%

Tamil Nadu

6,454

7,842

21%

Puducherry

148

160

8%

Andaman and Nicobar Islands

19

20

3%

Telangana

2,796

3,494

25%

Andhra Pradesh

2,141

2,595

21%

Ladakh

9

15

61%

Other Territory

110

132

20%

Centre Jurisdiction

121

191

58%

Grand Total

72,250

86,832

20%

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759962) Visitor Counter : 339