पंतप्रधान कार्यालय
गरीबांना सरकारवर अधिक अवलंबून ठेवून दारिद्रयाशी लढता येत नाही. जेव्हा गरीब सरकारकडे विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू लागतात तेव्हा गरीबीशी लढता येऊ शकते ”
"जेव्हा सत्तेचा उपयोग गरीबांना सशक्त करण्यासाठी केला जातो, तेव्हा त्यांना गरीबी विरोधात लढण्याची शक्ती मिळते"
"हवामानाचा अनिष्ट बदल कमी करण्याचा सर्वात सोपा आणि यशस्वी मार्ग म्हणजे निसर्गाशी सुसंगत जीवनशैली जगणे"
“महात्मा गांधी जगातील महान पर्यावरणवाद्यांपैकी एक आहेत. त्यांनी शून्य कार्बन फुटप्रिंट जीवनशैलीचे नेतृत्व केले.त्यांनी जे काही केले त्यात वसुंधरेच्या कल्याणाला सर्वतोपरी प्राधान्य दिले "
'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
कोविडने आपल्याला शिकवले की जेव्हा आपण एकीने असतो तेव्हा आपण अधिक मजबूत आणि चांगले असतो: पंतप्रधान
" मानवी लवचिकता इतर सर्व गोष्टींवर कशा प्रकारे मात केली हे अनेक पिढ्या लक्षात ठेवतील"
"गांधीजींनी विश्वासाचा सिद्धांत अधोरेखित केला ज्यात आपण सर्व पृथ्वीचे विश्वस्त असून तिची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे"
"भारत एकमेव G-20 राष्ट्र आहे जे पॅरिस वचनबद्धतेच्या मार्गावर वाटचाल करत आहे"
Posted On:
25 SEP 2021 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह', कार्यक्रमात व्हिडिओ संदेश दिला. हा 24 तासांचा कार्यक्रम असून 25 आणि 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे आणि मुंबई, न्यूयॉर्क, पॅरिस, रिओ डी जनेरियो यासह प्रमुख शहरांमधल्या थेट कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा आपण अधिक मजबूत आणि चांगले असतो याचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी महामारीच्या आव्हानाचा उल्लेख केला. “जेव्हा आपले कोविड -19 योद्धे, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महामारीशी लढण्यासाठी सर्वोत्तम योगदान दिले तेव्हा आपण या सामूहिक भावनेची झलक पाहिली. आपल्या शास्त्रज्ञ आणि नवसंशोधकांमध्ये आपण हि भावना पाहिली ज्यांनी विक्रमी वेळेत नवीन लस तयार केली. ज्या प्रकारे मानवी लवचिकतेने इतर सर्व गोष्टींवर विजय मिळवला ते भावी पिढ्या लक्षात ठेवतील ”, असे पंतप्रधान म्हणाले
कोविड व्यतिरिक्त बोलताना पंतप्रधान म्हणाले, गरीबी हे आव्हान अद्याप कायम आहे. मोदींनी नमूद केले की गरीबांना सरकारवर अधिक अवलंबून ठेवून दारिद्र्याशी लढता येत नाही. जेव्हा गरीब सरकारकडे विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू लागतात तेव्हा गरीबीशी लढता येऊ शकते . "विश्वासू भागीदार जे त्यांना सक्षम पायाभूत सुविधा देतील ज्यामुळे गरीबीचे दुष्टचक्र कायमचे नेस्तनाबूत होईल. ", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, जेव्हा सत्तेचा उपयोग गरीबांना सशक्त करण्यासाठी केला जातो, तेव्हा त्यांना गरीबीशी लढण्याचे बळ मिळते. गरीबांना सशक्त बनवण्याचे उदाहरण म्हणून त्यांनी बँक खाती नसलेल्यांना बँकिंग सेवेशी जोडणे, लाखो लोकांना सामाजिक सुरक्षा पुरवणे, 500 दशलक्ष भारतीयांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे यांसारख्या उपायांचा उल्लेख केला.
शहरे आणि गावांमध्ये बेघरांसाठी बांधण्यात आलेल्या 30 दशलक्ष घरांविषयी बोलताना मोदी म्हणाले की घर हा केवळ निवारा नाही. ‘डोक्यावरील छप्पर लोकांना प्रतिष्ठा देते.’, ते म्हणाले. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी, पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांसाठी एक ट्रिलियन डॉलर्सचा खर्च , 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले जात असून इतर अनेक प्रयत्नांमुळे गरीबी विरूद्धच्या लढाईला बळ मिळणार आहे. पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी हवामान बदलाच्या धोक्याबद्दल देखील चर्चा केली . ते म्हणाले की "हवामान बदल समस्या कमी करण्याचा सर्वात सोपा आणि यशस्वी मार्ग म्हणजे निसर्गाशी सुसंगत जीवनशैली जगणे हा आहे . "महात्मा गांधी " हे जगातील सर्वात महान पर्यावरणवादी असल्याचे सांगत गांधीजींनी शून्य कार्बन फुटप्रिंट जीवनशैली कशी जगली हे स्पष्ट केले. त्यांनी जे काही केले त्यात आपल्या वसुंधरेच्या कल्याणाला सर्वतोपरी प्राधान्य दिले. पंतप्रधानांनी महात्मा यांनी मांडलेल्या विश्वस्त सिद्धांतावर भर दिला. 'जिथे आपण सर्व या पृथ्वीचे विश्वस्त आहोत , तिची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे'. भारत हे एकमेव G-20 राष्ट्र आहे जे पॅरिस कराराच्या वचनबद्धतेच्या मार्गावर वाटचाल करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती लवचिकता पायाभूत सुविधा आघाडी च्या छत्राखाली जगाला एकत्र आणल्याचा भारताला अभिमान आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758378)
Visitor Counter : 224
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam