युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी येत्या 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा आरंभ करत असल्याची केली घोषणा

Posted On: 26 SEP 2021 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26  सप्टेंबर 2021

केंद्र सरकार, येत्या 1 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत महिनाभर कचरा, प्रामुख्याने एकदाच  वापरण्यायोग्य  प्लास्टिकचा कचरा, स्वच्छ करण्यासाठी देशव्यापी स्वच्छ भारत अभियान सुरू करणार आहे.

आज आपल्या ट्वीटर संदेशाद्वारे याची घोषणा करताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री. अनुराग ठाकूर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आपण जसा आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत , त्याचप्रमाणे गांधीजींच्या  स्वप्नातील भारत आणि  आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातील  प्लास्टिकमुक्त भारत, निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. यात स्वच्छतेला  सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ठाकुर यांनी सर्वांना उत्साहाने या मोहिमेत सामील होण्याचे आणि 'संकल्प से सिद्धी' हे ध्येय साध्य करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

श्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ही जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम असेल ज्यात देशाच्या विविध भागातून 75 लाख टन पेक्षा जास्त कचरा, प्रामुख्याने प्लास्टिक कचरा गोळा केला जाईल आणि पुढे 'वेस्ट टू वेल्थ' (कचऱ्यातून ऐश्वर्या कडे) या उद्देशाने यावर प्रक्रिया केली जाईल.  या मोहिमेचा उद्देश "स्वच्छ भारत: सुरक्षित भारत" या मंत्राचा प्रसार करणे आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संघटना, भागधारक इत्यादी खालील लिंकवर नोंदणी करू शकतात:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnk5KMQ_bvtk1cFe56oCya0p3semGoKY5vEOJDdPtxzWAdaA/viewform

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1758345) Visitor Counter : 396