राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019-20 साठीची राष्ट्रीय सेवा योजनेची पारितोषिके प्रदान
Posted On:
24 SEP 2021 2:16PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2019-20 साठीची राष्ट्रीय सेवा योजनेची पारितोषिके आज एका आभासी समारंभात प्रदान केली.
यावेळी राष्ट्र्रपती म्हणाले, की, “ माणसाच्या भावी आयुष्याचा भव्य प्रासाद विद्यार्थी जीवनाच्या पायावरच उभा राहत असतो. मानव आयुष्यभरासाठी विद्यार्थी असतोच पण तरीही मूळ व्यक्तिमत्वाचा खरा विकास विद्यार्थीदशेतच होतो.” त्यांच्या मते NSS ही एक भविष्यवेधी योजना असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनातच समाज व देशसेवेची सुसंधी मिळते.
राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 1969 साली महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या दिवशी झाली होती, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. महात्मा गांधींनी त्यांचे पूर्ण जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत केले होते. आपल्या तरुणांनी स्वतःला पूर्ण ओळखून एक जबाबदार नागरिक बनले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ‘स्वतःला पूर्ण ओळखण्यासाठी समाजसेवेत झोकून देणे हा सर्वोत्तम मार्ग आहे’, असे त्यांचे मत होते. गांधीजींचे जीवन हे मानवसेवेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचे आदर्श व सेवाभाव आपणा सर्वांना आजच्या काळातही प्रेरणादायी ठरतो आहे.
कोविड-19 महामारीच्या सुरुवातीच्या काळात मुखपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होण्याआधी , 2 कोटी 30 लाख मुखपट्ट्या NSS स्वयंसेवकांनी बनवून देशभरात वितरित केल्या होत्या. हेल्पलाईन च्या माध्यमातून कोविड संबंधीची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठीही NSS स्वयंसेवक पुढे आले होते, तसेच त्यांनी अनेक जिल्हा प्रशासनांना जनजागृती व मदतकार्यातही सहायय केले होते, याचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. .
राष्ट्रपती म्हणाले, की स्वातंत्र्यप्राप्तीच्या या 75 व्या वर्षी देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा होत आहे. यासाठी NSS चे स्वयंसेवक भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर व स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर अनेक वेबिनार्स /सेमिनार्स आयोजित करत आहेत. आपला स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यसैनिकांबद्दल जनजागृती करणे, ही देखील एक प्रकारची देशसेवाच असल्याचे ते पुढे म्हणाले.
युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 1993-94 साली या पुरस्कारांची सुरुवात केली होती. देशभरातील विद्यापीठे/ महाविद्यालये, (+2) परिषदा , उच्च माध्यमिक विद्यालये, NSS युनिट्स / कार्यक्रम अधिकारी आणि NSS स्वयंसेवक यांनी स्वैच्छिक समाजसेवेसाठी दिलेल्या विशेष योगदानाला मान्यता देऊन पुरस्कृत करणे हा यामागचा हेतू आहे.
Click here to see President's Speech in Hindi
***
U.Ujgare/U.Raikar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757652)
Visitor Counter : 399
Read this release in:
Malayalam
,
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada