आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत  82.65 कोटीहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या
                    
                    
                        
भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.77%
गेल्या 24 तासात कोरोनाच्या 26,964 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद
 
देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,01,989) , असून ती आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 0.90 %
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%) गेले 89 दिवस हा दर 3% पेक्षा कमी
                    
                
                
                    Posted On:
                22 SEP 2021 9:44AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                भारतात गेल्या 24 तासात लसींच्या 75,57,529 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 82.65 कोटींपेक्षा अधिक मात्रा (82,65,15,754 ) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,05,030 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटानिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-
 
	
		
			| 
			 HCWs 
			 | 
			
			 1st Dose 
			 | 
			
			 1,03,69,831 
			 | 
		
		
			| 
			 2nd Dose 
			 | 
			
			 87,67,189 
			 | 
		
		
			| 
			   
			FLWs 
			 | 
			
			 1st Dose 
			 | 
			
			 1,83,46,681 
			 | 
		
		
			| 
			 2nd Dose 
			 | 
			
			 1,46,16,924 
			 | 
		
		
			| 
			   
			Age Group 18-44 years 
			 | 
			
			 1st Dose 
			 | 
			
			 33,47,62,522 
			 | 
		
		
			| 
			 2nd Dose 
			 | 
			
			 6,47,24,317 
			 | 
		
		
			| 
			   
			Age Group 45-59 years 
			 | 
			
			 1st Dose 
			 | 
			
			 15,29,73,905 
			 | 
		
		
			| 
			 2nd Dose 
			 | 
			
			 7,07,83,297 
			 | 
		
		
			| 
			   
			Over 60 years 
			 | 
			
			 1st Dose 
			 | 
			
			 9,79,37,287 
			 | 
		
		
			| 
			 2nd Dose 
			 | 
			
			 5,32,33,801 
			 | 
		
		
			| 
			 Total 
			 | 
			
			 82,65,15,754 
			 | 
		
	
 
गेल्या 24 तासात 34,167 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,83,741
रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.  
 
त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे.रूग्ण कोविडमुक्त होण्याचा सध्याचा दर मार्च 2020 पासूनच्या सर्वाधिक उच्च स्तरावर आहे.
 

 
केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 86 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे.
गेल्या 24 तासात 26,964 नव्या रुग्णांची नोंद झाली
 

 
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,989 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,92,395 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.67 कोटींहून अधिक (55,67,54,282) चाचण्या केल्या आहेत.
 
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.08% असून गेले 89 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69% इतका आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 23 दिवस 3% पेक्षा कमी आणि 106 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

***
Jaydevi PS /SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1756926)
                Visitor Counter : 373