सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना प्राप्त झालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ई-लिलावाची तिसरी फेरी आजपासून सुरू


7 ऑक्टोबर 2021 पर्यंत ई-लिलाव सुरु राहणार

ई-लिलावातून मिळणारी रक्कम नमामी गंगे अभियानाला जाणार

Posted On: 17 SEP 2021 6:38PM by PIB Mumbai

 

मुख्य ठळक मुद्दे:

  • ई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतीचिन्हांचा ई-लिलाव होत आहे
  • ई-लिलावामध्ये व्यक्ती/संस्था https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाद्वारे सहभागी होऊ शकतात
  • टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020  ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील  विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून  दिलेले क्रीडा साहित्य  आणि उपकरणे ही लिलावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या प्रतिष्ठेच्या आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या ई-लिलावाची तिसरी फेरी  https://pmmementos.gov.in  या वेब पोर्टलद्वारे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020  ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील  विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा या ई- लिलावात समावेश आहे. इतर चित्तवेधक कलाकृतींमध्ये अयोध्या राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती  शिल्प, चित्रेवस्त्रे आदींचा समावेश आहे.

ई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव केला जात आहे. टोक्यो  2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील  सुवर्णपदक विजेता श्री सुमित अंतिल यांनी वापरलेला भाला आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्समध्ये श्री नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला हा सर्वात जास्त किंमत असलेली वस्तू आहे,या भाल्यांची कमीत कमी अपेक्षित किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.  रु. 200. किंमतीचा लहान आकाराचा सजावटीचा हत्ती हा सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे.

केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी एका ट्विटद्वारे लिलावासंदर्भात माहिती दिली आहे.

लव्हलीना बोर्गोहेनने वापरलेल्या आणि तिने स्वतः स्वाक्षरी केलेल्या  निळ्या बॉक्सिंग ग्लोव्हजसारख्या  इतर काही वस्तू देखील लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता कृष्णा नागर याने स्वाक्षरी  केलेले बॅडमिंटन रॅकेट देखील बोलीसाठी ठेवण्यात आले आहे.तसेच टोक्यो  2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती भाविना पटेलने या स्पर्धेत खेळताना वापरलेले टेबल टेनिस रॅकेटही या ई- लिलावात ठेवण्यात आले आहे.

 

 

 

17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 दरम्यान https://pmmementos.gov.in  या संकेतस्थळाद्वारे व्यक्ती/संस्था ई -लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात.

ई-लिलावातून मिळणारी रक्कम गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने 'नमामि गंगे 'अभियानाला  जाईल. "नमामि गंगे" अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा - गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठी,.मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. उत्तराखंडमधील गौमुख येथे नदीच्या उगमस्थानापासून ते पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये विलीन होणाऱ्या या सामर्थ्यशाली  नदीने देशातील अर्ध्या लोकसंख्येचे जीवन समृद्ध केले आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी अनेकदा गंगा नदीचे वर्णन  देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून केले आहे.

प्रमुख वस्तूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1755844) Visitor Counter : 329