सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू व स्मरणचिन्हे यांचा ई-लिलाव सांस्कृतिक मंत्रालयाकडून 17 सप्टेंबर पासून आयोजित
लिलावातून जमा झालेली रक्कम नमामि गंगे योजनेला
Posted On:
16 SEP 2021 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021
महत्वाचे:
- स्मरणचिन्हांमध्ये ऑलिंपिक तसेच परालिम्पिक विजेत्यांचे क्रीडा साहित्य आणि उपकरणे तसेच अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती यांचा समावेश.
- व्यक्ती किंवा संस्था 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत : https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लिलावात भाग घेऊ शकतील.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा व स्मरणचिन्हाचा ई-लिलाव आयोजित केला आहे.
स्मरणचिन्हांमध्ये पदक विजेते ऑलिंपिक वीर तसेच पॅरालिम्पिक विजेत्यांच्या क्रीडा साहित्याचा आणि उपकरणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अयोध्या राम मंदिर , चारधाम , रुद्रकेश सामुदायिक केंद्र यांच्या प्रतिकृती, शिल्प, चित्र आणि मानाच्या शाली यांचाही समावेश आहे.
व्यक्ती किंवा संस्थांना https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून 17 सप्टेंबर ऑक्टोबर 2021 या कालावधीत या ई-लिलावात भाग घेता येईल.
या लिलावातून जमा झालेली रक्कम नमामि गंगे योजना या गंगा नदीचे संरक्षण आणि पुनरूज्जीवन हे लक्ष्य असलेल्या 'नमामि गंगे' या योजनेसाठी दिली जाईल.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755585)
Visitor Counter : 234