निती आयोग

अटल इनोवेशन मिशन आणि दसॉं सिस्टीम्स यांची भागीदारी संशोधनाला चालना देणारी

Posted On: 16 SEP 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021

अटल इनोवेशन मिशन आणि निती आयोग यांच्या सहयोगाने दसाँ सिस्टीम्स देशामध्ये संशोधनाला चालना देऊन नव उद्योजकतेचे पर्यावरण विकसित करण्यास हातभार लावेल.

अटल इनोवेशन मिशन आणि दसॉं सिस्टीम यांच्यामध्ये आज एका दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सध्याच्या तसेच भविष्यातील अटल संशोधन योजना कार्यक्रम आणि त्याच्या भारतातील लाभार्थींना मदत देण्यासंबधीच्या इरादापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या.  

या इरादापत्रानुसार अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोवेशन मिशनचा भाग असलेले कार्यक्रम (AICs and EICs), अटल कम्युनिटी इनोवेशन सेंटर्स (ANIC), अटल न्यू इंडिया चॅलेंज (ANIC) अनुदानपात्रित, अटल रिसर्च ॲंड इनोवेशन फॉर स्मॉल एंटरप्राइज या अटल इंनोवेशन मिशनच्या लाभार्थींना दसॉं सिस्टीम सहकार्य करेल.

नवउद्योजकांमध्ये संशोधन आणि उद्योजकता वाढीला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे उच्च दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित सेवा तसेच उत्पादने किफायतशीर करणाऱ्या संशोधनाला चालना देणारा ठरेल.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1755492) Visitor Counter : 201