ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर्व आशिया शिखर परिषदेच्या उर्जा मंत्र्यांची 15 वी बैठक

Posted On: 16 SEP 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021

पूर्व आशिया शिखर परिषदेच्या उर्जा मंत्र्यांची 15 वी बैठक आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. केंद्रीय उर्जा राज्य मंत्री क्रिशन पाल गुर्जर आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

‘वुई केअर, वुई प्रीपेअर, वुई प्रॉस्पर’ अर्थात आम्ही काळजी घेऊ, सज्ज राहू आणि प्रगती करू अशी या बैठकीची संकल्पना आहे. उर्जा सुरक्षितता आणि उर्जा संक्रमण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आसियान देशांचे प्रयत्न समन्वित करण्याचा याचा उद्देश आहे. या प्रयत्नातून आपल्या प्रांतातल्या जनतेचे हित साधले जाणार आहे.

भारतासाठी आसियान अतिशय महत्वाचा प्रदेश असल्याचा पुनरुच्चार भारताने केला. आसियानशी संपर्क राखणे हा अ‍ॅक्ट इस्ट धोरण आणि रणनीती अंतर्गत असलेला महत्वाचा घटक आहे. भारताच्या इंडो- पॅसिफिक  दृष्टिकोनाचा अ‍ॅक्ट इस्ट हा मध्यवर्ती घटक आहे.

भारताचे उर्जा संक्रमण नियोजन, धोरणे, आव्हाने आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे प्रयत्न याबाबत मंत्र्यांनी संक्षिप्त माहिती दिली.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1755450) Visitor Counter : 170