आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती - 241वा दिवस


भारताने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम, एकूण लसीकरणाने ओलांडला 75 कोटी मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

भारतातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांपैकी 99% हून अधिक कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची एक मात्रा देण्यात यश

Posted On: 13 SEP 2021 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2021 

 

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 75 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण  (75,10,41,391) टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 67 लाखांपेक्षा अधिक (67,04,768)  मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारतातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांपैकी 99% हून अधिक कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची एक मात्रा देण्यात आपण यशस्वी झालो आहोत. 

देशातील लसीकरणाच्या संख्येने 75 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी संपूर्ण देशाचे कौतुक केले आहे.

देशातील लसीकरण मोहिमेला आणखी वेग प्राप्त करून दिल्याबद्दल आणि 75 कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल जगातील आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रदेश संघटनेने भारताचे अभिनंदन केले आहे.

आतापर्यंतच्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,64,684

2nd Dose

86,11,479

FLWs

1st Dose

1,83,38,713

2nd Dose

1,41,01,351

Age Group 18-44 years

1st Dose

30,26,12,416

2nd Dose

4,52,87,346

Age Group 45-59 years

1st Dose

14,45,93,468

2nd Dose

6,37,26,534

Over 60 years

1st Dose

9,36,68,415

2nd Dose

4,97,36,985

Cumulative 1st dose administered

56,95,77,696

Cumulative 2nd dose administered

18,14,63,695

Total

75,10,41,391

कोविड – 19 संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित असलेल्या वयोगटातील लोकांच्या  संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जातो आणि सर्वोच्च पातळीवरून परीक्षण केले जाते.

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754661) Visitor Counter : 159