खाण मंत्रालय

जॉइंट स्टॉक कंपनी रॉसजीओलॉजीया, रशिया आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय), भारत यांच्यात भू -विज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 08 SEP 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्‍टेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रशियन महासंघाच्या नियमांतर्गत स्थापन जॉईंट स्टॉक कंपनी रॉसजीओलॉजीया (स्टेट होल्डिंग कंपनी) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांच्यात भू -विज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावर  स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.

या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट खोलवर दडलेल्या खनिजांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक सहकार्य,  एरो-जिओफिजिकल डेटाचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण, पीजीई  आणि आरई ई अन्वेषण आणि संशोधन; रशियन अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानासह भारतीय भू-विज्ञान डेटा भांडाराचा संयुक्त विकास; अचूक डेटा आणि किमान खर्च साध्य करण्यासाठी ड्रिलिंग, सॅम्पलिंग आणि प्रयोगशाळा विश्लेषण क्षेत्रात तंत्रज्ञान आणि ज्ञानाची देवाणघेवाण; आणि वैज्ञानिक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती क्षेत्रात परस्पर सहकार्य करणे हा आहे.

रॉसजीओ आणि जीएसआयचा समृद्ध अनुभव आणि त्यांच्या सहकार्याची शक्यता लक्षात घेऊन  भू-विज्ञान क्षेत्रात जीएसआय  आणि रॉसजीओ यांच्यातील सहकार्यासाठी एकीकृत चौकट प्रदान करण्यासाठी हा सामंजस्य करार विशेष फायदेशीर आहे.

जॉइंट स्टॉक कंपनी रॉसजीओलॉजिया (ROSGEO) रशियन महासंघातील विकसित उत्पादन आणि तांत्रिक क्षमता, उच्च व्यावसायिक क्षमता आणि संचित भूवैज्ञानिक माहितीची व्याप्ती असलेली सर्वात मोठी भूवैज्ञानिक स्टेट होल्डिंग कंपनी आहे. कंपनी सर्व प्रकारच्या खनिज संसाधनांसाठी प्रादेशिक सर्वेक्षणापासून सर्व प्रकारचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि शोधकार्य करते. ऑफशोअर भौगोलिक आणि ऑन-शेल्फ ऑपरेशन्स क्षेत्रात त्यांची अफाट क्षमता आहे.

वर्ष 2020 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान, ROSGEO च्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत खाण मंत्रालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाशी शोध कार्यातील सहकार्याच्या दृष्टिकोनावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत, जीएसआय आणि रॉसजीओ यांच्यात भूविज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी एक सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार,  जीएसआयने रॉसजीओशी सल्लामसलत करून कराराचा मसुदा अंतिम केला.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753146) Visitor Counter : 117