गृह मंत्रालय

कोविड-19 मुळे भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हीसा किंवा निवासाची परवानगी असलेला काळ 30 सप्टेंबर 2021 पर्यंत (वैध) समजला जाईल

Posted On: 02 SEP 2021 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, अनेक परदेशी नागरिक, जे विविध प्रकारचे व्हिसा घेऊनमार्च 2020 पासून भारतात आले आहेत, आणि आता विमानसेवा सुरु नसल्याने ते भारतातच अडकून पडले आहेत, अशा सर्व नागरिकांना केंद्र सरकारने भारतात राहण्याची परवानगी दिली असून, त्यांच्या नियमित व्हिसा किंवा स्टे स्टीप्युलेशन सुविधेच्या कालावधीची मुदत वाढलेली गृहीत धरली जाईल, असे  गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यासाठी परदेशी नागरिकांना कोणताही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत उपलब्ध होती आता ती 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अशा परदेशी नागरिकांना आता त्यासाठी, एफआरआरओ/एफआरओ कडे आपल्या व्हिसाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून घेण्यासाठी कुठलाही वेगळा अर्ज करावा लागणार नाही. मात्र, देश सोडण्यापूर्वी त्याना देश सोडण्यासाठी ई-एफआरआरओ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. संबंधित एफआरआरओ/एफआरओ कडून हा अर्ज, कुठलाही विलंब शुल्क न आकारता मंजूर केला जाईल.

जर कोणत्या परदेशी नागरिकाला 30 सप्टेंबर 2021 च्या पलीकडे  आपला व्हीसाची मुदत वाढवून हवी असेल, तर ते ई-एफआरआरओ प्लॅटफॉर्मवर तसा अर्ज करु शकतील, सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेच्या निकषांवर या अर्जाला मंजूरी दिली जाईल.

तसेच, अफगाण नागरिकांसाठी जारी करण्यात आलेल्या वेगळ्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे त्यांना व्हिसाची मुदत वाढवून दिली जाईल. 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751528) Visitor Counter : 209