अर्थ मंत्रालय

अटल पेन्शन योजनेसाठीच्या नोंदणीसंख्येने ओलांडला 3.30 कोटींचा टप्पा


आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यात योजनेच्या 28 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी केली नोंदणी

Posted On: 01 SEP 2021 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2021

 

केंद्र सरकारच्या आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण- PFRDA मार्फत चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, या निवृत्तीवेतनाची हमी देणाऱ्या योजनेअंतर्गत, चालू आर्थिक वर्षात तब्बल 28 लाख नवी खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत, एकंदर झालेल्या नोंदणी संख्येने, 25 ऑगस्ट 2021 रोजी 3.30 कोटींचा टप्पा ओलांडला.

अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीची वर्षनिहाय बँक श्रेणीनुसार नोंदणी संख्या खालीलप्रमाणे :

Category of Banks

As on (March 31, 2016)

As on (March 31, 2017)

As on (March 31, 2018)

As on (March 31, 2019)

As on (March 31, 2020)

As on (March 31, 2021)

Additions from April 1, 2021 to August 25, 2021

As on (August 25, 2021)

Public Sector Banks

1,693,190

3,047,273

6,553,397

10,719,758

1,56,75,442

2,12,52,435

20,74,420

2,33,26,855

Private Banks

218,086

497,323

873,901

1,145,289

15,62,997

19,86,467

77,875

20,64,342

Small Finance Bank & Payment Bank

 

 

 

57372

359761

853914

224705

1078619

Regional Rural Banks

476,373

1,115,257

1,987,176

3,171,152

43,30,190

57,10,770

4,21,104

61,31,874

Cooperative Banks

21,903

33,978

45,621

54,385

70,556

80,073

4,554

84,627

DOP

75,343

189,998

245,366

270,329

3,02,712

3,32,141

7,774

3,39,915

Total

24,84,895

48,83,829

97,05,461

1,54,18,285

2,23,01,658

3,02,15,800

28,10,432

3,30,26,232

 

चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, देशातील प्रमुख बँकांमध्ये एक लाखपेक्षा अधिक अटल पेन्शन खाती उघडण्यात आलेल्या बँका:

Sr. No.

Bank Name

Number of APY accounts enrolled between April 1, 2021 to August 24, 2021

1

State Bank of India

7,99,428

2

Canara Bank

2,65,826

3

Airtel Payments Bank Limited

2,06,643

4

Bank Of Baroda

2,01,009

5

Union Bank of India

1,74,291

6

Bank Of India

1,30,362

7

Indian Bank

1,13,739

8

Central Bank of India

1,04,905

9

Punjab National Bank

1,01,459

 

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, 25 ऑगस्टपर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक नोंदणी झालेली प्रमुख राज्ये खालीलप्रमाणे :

Sr. No

State Name

Number of APY enrolments

1

Uttar Pradesh

49,65,922

2

Bihar

31,31,675

3

West Bengal

26,18,656

4

Maharashtra

25,51,028

5

Tamil Nadu

24,55,438

6

Andhra Pradesh

19,80,374

7

Karnataka

19,74,610

8

Madhya Pradesh

19,19,795

9

Rajasthan

16,16,050

10

Gujarat

13,50,864

11

Orissa

12,45,837

अटल पेन्शन योजनेअंतर्गत 25 ऑगस्ट 2021 पर्यंत उघडण्यात आलेल्या एकूण खात्यांपेकी सुमारे 78% ग्राहकांनी 1,000 रुपयांची पेन्शन योजना तर, 14% ग्राहकांनी 5,000 रुपयांची पेन्शन योजना निवडली आहे. तसेच, यात 44% टक्के महिला ग्राहक असून 44% ग्राहक अत्यंत तरुण म्हणजेच, 18-25 वर्षे वयोगटातील आहेत. 

अलीकडच्या काळात, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने या योजनेत काही नवे उपक्रम राबवले असून, त्यात, एपीवाय मोबाईल अॅप सुरु करत, उमंग प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध करुन देणे, एपीआय संबंधित वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे अद्ययावतीकरण, एपीवाय ग्राहकांना या योजनेविषयीची सर्व माहिती 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होईल, हे सुनिश्चित करणे, जेणेकरुन सध्या असलेल्या आणि अपेक्षित एपीवाय ग्राहकांपर्यंत योजनेची माहिती पोचून त्यांना त्याचा लाभ घेणे शक्य होईल, यांची तजवीज करणे, अशा उपाययोजना केल्या आहेत.

वाढत्या नोंदणीमुळे उत्साहित होऊन, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने,  देश आणि राज्य पातळीवर अटल पेन्शन योजनेविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यक्रम देश आणि राज्य पातळीवर राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनच्या समन्वयाने आयोजित केले जातील. याविषयी मुद्रित, समाज आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिराती दिल्या जातील. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अटल पेन्शन योजनेत एकूण नोंदणी नव्या उच्चांकावर नेऊन भारताला अधिकाधिक लोकांना निवृत्तीवेतन उपलब्ध असणारा समाज बनवण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.

 

अटल पेंशन योजने विषयी माहिती :

अटल पेंशन योजनेत 18-40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक, त्यांच्या बँक अथवा आपले बचत खाते असलेल्या टपाल खात्याच्या शाखांच्या माध्यमातून  सहभागी होऊ शकतात. या योजनेअंतर्गत, ग्राहकांना, वयाच्या 60 वर्षांनंतर, त्यांच्या योगदानानुसार महिना 1,000 ते 5,000 रुपये निवृत्तीवेतन मिळेल.

विविध बँका आणि टपाल विभागाच्या 266 अटल पेंशन योजना सेवा प्रदात्यांमार्फत ही योजना वितरीत केली जाते.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751125) Visitor Counter : 278