PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
29 AUG 2021 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 29 ऑगस्ट 2021



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतातील समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 63 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात 73,85,866 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या असून, आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या तात्पुरत्या उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने 63 कोटी 09 लाखाचा (63,09,17,927) टप्पा पार केला. हे लसीकरणाच्या 67,80,301 सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले आहे.
आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येची विभागणी खालीलप्रमाणे आहे:
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,57,335
|
|
2nd Dose
|
83,48,055
|
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,18,644
|
|
2nd Dose
|
1,30,57,806
|
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
24,22,90,397
|
|
2nd Dose
|
2,60,65,825
|
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
12,89,66,672
|
|
2nd Dose
|
5,31,54,542
|
|
Over 60 years
|
1st Dose
|
8,60,95,654
|
|
2nd Dose
|
4,42,62,997
|
|
Total
|
63,09,17,927
|
संपूर्ण देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 35,840 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून) आतापर्यंत कोविड मधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,18,88,642 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.53 % वर आला आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्ममक प्रयत्नांमुळे गेले सलग 63 दिवस रोज नोंदविल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.
भारतात गेल्या 24 तासात 45,083 नव्या कोविडबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या 3,68,558 आहे. ही संख्या देशातील एकूण कोविड बाधित संख्येच्या 1.13 % आहे.

देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरू असून गेल्या 24 तासांत एकूण 17,55,327 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 86 लाख (51,86,42,929) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार होत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.28 % इतका आहे. हा दर गेले 65 दिवस 3 % पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील आज 2.57 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आता गेले 34 दिवस 3 % पेक्षा कमी आणि सलग 83 दिवस 5 % पेक्षा कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स:-
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750224)
अभ्यागत कक्ष : 175