पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगतीची’ 37 वी आढावा बैठक

Posted On: 25 AUG 2021 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती- म्हणजेच – आयसीटी आधारित पुढाकार घेऊन कार्यरत प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीचा बहु-पर्यायी प्लॅटफॉर्म-PRAGATI अंतर्गत कामांचा आढावा घेतला.

या बैठकीत, अजेंड्यावर असलेल्या नऊ विषयांचा आढावा घेण्यात आला. यात आठ प्रकल्प आणि एका योजेनचा समावेश आहे. या आठ  प्रकल्पांपैकी प्रत्येकी तीन-तीन प्रकल्प रेल्वे तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्रालयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तर दोन प्रकल्प ऊर्जा मंत्रालयांचे होते. या आठ प्रकल्पांची एकूण किंमत 1,26,000 कोटी रुपये इतकी असून, हे प्रकल्प- उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगढ,अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, माणिपूर आणि दिल्ली या 14 राज्यांत राबवले जात आहेत.

या बैठकीत, पंतप्रधानांनी हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी झालेल्या चर्चेत, पंतप्रधानांनी ‘एक देश- एक रेशन कार्ड’ या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या  तंत्रज्ञानाच्या सर्व प्लॅटफॉर्म सुविधांचा पुरेपूर वापर करत नागरिकांपर्यंत योजनांचा जास्तीत जास्त लाभ पोचवण्याचे आवाहन केले

तसेच, राज्यातील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्लांट आणि रुग्णालयात खाटांची उपलब्धता याकडेही देखरेख ठेवत राहावी अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

आधीच्या 36 प्रगती बैठकांमध्ये 13.78  लाख कोटी रुपये खर्चाच्या 292 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.


* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749084) Visitor Counter : 267