अर्थ मंत्रालय

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचा EASE 4.0 चा केला प्रारंभ


EASE 3.0 च्या पुरस्कार विजेत्यांचीही केली घोषणा

Posted On: 25 AUG 2021 5:26PM by PIB Mumbai

मुंबई, 25 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, तंत्रज्ञान आधारित, सुलभ आणि सहकार्यात्मक बँकिंगसाठी, सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रम 2021-22 साठी, चौथी आवृत्ती EASE 4.0 चा प्रारंभ केला. EASE 3.0 सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रमासाठीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही त्यांनी केले. EASE 3.0 बँकिंग सुधारणा निर्देशांकासाठी  उत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांच्या  पारितोषिक वितरण कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. 

वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज जैन, वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल आणि आयबीएचे अध्यक्ष राजकिरण राय या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक सुधारणा EASE 3.0  मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी सर्वोच्च पुरस्कार पटकावले.  

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी EASE निर्देशांक आधारित,  सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक सुधारणा EASE 3.0  मध्ये  उत्तम कामगिरी करणाऱ्या बँका म्हणून पुरस्कार पटकावले. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पीएनबी , कॅनरा बँक यांनी सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रम EASE 3.0.च्या विविध संकल्पना अंतर्गत सर्वोच्च पुरस्कार मिळवले.

   

   

Details of EASE 3.0 Awards can be accessed here

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी  पोषक नफा नोंदवत तंत्रज्ञान आधारित सुधारणांना वेग दिला आहे

एकंदरीत कामगिरी

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी, वित्तीय वर्ष 20 च्या 26,016 कोटी रुपयांच्या तुलनेत, वित्तीय वर्ष 21 मध्ये 31,817 कोटी रुपये नफ्याची नोंद केली.पाच वर्षाच्या तोट्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी प्रथमच नफ्याची नोंद केली आहे. मार्च 2021 ला एकूण ढोबळ अनुत्पादित मालमत्ता 6.16 लाख कोटी रुपये  राहिली, मार्च 2020 च्या स्तरापासून 62,000 कोटी रुपयांनी घटली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये 3,704 वित्तीय घोटाळ्यांच्या संख्येत लक्षणीय घसरण होऊन 2020-21या वित्तीय वर्षात ही संख्या 2,903 झाली,

  • Credit@click हा EASE 3.0 अंतर्गत एक महत्वाकांक्षी उपक्रम होता. सार्वजनिक क्षेत्रातील अव्वल  7 बँकांनी (1 एप्रिल 2020 रोजी एकूण व्यवसाय आकारमानावर  आधारित) प्रमुख किरकोळ आणि एमएसएमई क्रेडिट उत्पादनांच्या  डिजिटलायझेशनद्वारे त्वरित आणि संपर्कविरहित कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारली  आहे. मार्च 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत असुरक्षित वैयक्तिक कर्जासाठी (UPL)  5,502 कोटी रुपये नवीन कर्ज स्वरूपात आणि छोट्या रकमेचे कर्ज म्हणून  124 कोटी रुपये डिजिटल पद्धतीने  वितरित करण्यात आले. तात्काळ आणि सुलभ पतपुरवठ्याच्या माध्यमातून सुमारे 4.4 लाख ग्राहकांना याचा  लाभ मिळाला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ( पीएसबी ) ग्राहकांसाठी एक यंत्रणा उभारली आहे जिथे ते मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग, एसएमएस, मिस्ड कॉल आणि कॉल सेंटरसारख्या डिजिटल साधनांद्वारे  24X7 कर्जासाठी विनंती नोंदवू शकतात. आर्थिक वर्ष 21 मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अशा डिजिटल साधनांद्वारे एकत्रितपणे 40,819 कोटी रुपये  वैयक्तिक, गृह आणि वाहन कर्ज म्हणून वितरित  केले आहे जे एकूण वितरणाच्या अंदाजे 10% आहे.
  • अव्वल 7 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या विद्यमान ग्राहकांना सक्रियपणे कर्ज देण्यासाठी समर्पित विश्लेषक टीम आणि Iमाहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा उभारून विश्लेषण क्षमता निर्माण केली आहे. आर्थिक वर्ष 21 मध्ये, या पतपुरवठयाच्या आधारे अव्वल 7 पीएसबीनी 49,777 कोटी रुपयांचे नवीन किरकोळ कर्ज वितरित केले .   
  • पीएसबीनी  किरकोळ श्रेणी  आणि एमएसएमई श्रेणीच्या  कर्जाच्या सोर्सिंगसाठी बाह्य भागीदारी आणि समर्पित विपणन मनुष्यबळाचा  मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. आर्थिक वर्ष 21 मध्ये 9.1 लाख कर्ज अशा माध्यमातून  सोर्सिंग करण्यात आले आहे.

मोबाइल/इंटरनेट बँकिंग आणि ग्राहक सेवा

  • मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग चॅनेलवर सक्रिय असलेल्या पीएसबी  ग्राहकांची संख्या मार्च 202० मध्ये संपलेल्या तिमाहीतील  3.4 कोटी वरून मार्च 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 7.6 कोटी इतकी वाढली आहे. पीएसबीमध्ये होत असलेले सुमारे 72% आर्थिक व्यवहार आता डिजिटल चॅनेलद्वारे होत आहेत.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता कॉल सेंटर, इंटरनेट बँकिंग, आणि मोबाईल बँकिंगमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी मराठीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये सेवा पुरवत आहेत

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या  96% शाखांमध्ये आता आर्थिक वर्ष 21 च्या चौथ्या तिमाहीत स्थानिक भाषांमध्ये अस्खलित संवाद साधणारा किमान एक अधिकारी  आहे.

आर्थिक समावेशकता  उपक्रमांअंतर्गत कव्हरेजमध्ये निरंतर सुधारणा करण्यासाठी, ग्रामीण भागात बँक मित्रांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये 13% वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष 20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 च्या चौथ्या तिमाहीत सूक्ष्म वैयक्तिक अपघात विम्याच्या नोंदणीमध्ये 50% वाढ झाली आहे.

कर्जाची जोखीम आणि विवेकी बँकिंग

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वसुली वेगाने करण्यासाठी ओटीएस, ई- बिक्रय, ई- डीआरटी यांसारखे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. 2021 या आर्थिक वर्षात ई- बिक्रयवर ई-लिस्टींगद्वारे सुमारे 4068 कोटी रुपये मूल्यांच्या मालमत्तांची वसुली झाली आहे.
  • आयटी आधारित तात्काळ इशारा संकेत प्रणाली(ईडब्लूएस) तैनात केल्यामुळे सार्वजनिक उपक्रमातील सर्वच बँकांमध्ये EASE 2.0 जवळजवळ पूर्ण झाले आहे. या प्रणालीच्या व्याप्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च 2021च्या अखेरपर्यंत 33 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पुस्तिका ईडब्लूएस च्या कक्षेत आल्या आहेत.

यापूर्वीच्या वर्षांप्रमाणेच सार्वजनिक बँकांनी केलेल्या प्रगतीची प्रकाशित EASE सुधारणा निर्देशांकाच्या द्वारे तिमाही नोंद ठेवण्यात आली ज्यामुळे वार्षिक आढावा घेता आला. हा निर्देशांक प्रत्येक सार्वजनिक बँकेच्या कामगिरीचे 135 पेक्षा जास्त निकषांद्वारे पाच विषयांनुसार मोजमाप करतो. सर्व सार्वजनिक बँकांची तुलनात्मक कामगिरीचे मूल्यमापन उपलब्ध करून देतो आणि सुधारणाविषयक आराखड्याला पाठबळ देतो. अतिशय पारदर्शक गुणमोजणी पद्धतीवर हा निर्देशांक आधारित असून त्यामुळे बँकांना आपल्या क्षमतांचे त्याचबरोबर सुधारणांना वाव असलेल्या क्षेत्रांचे अतिशय अचूकतेने आकलन करता येते. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची EASE 3.0 निर्देशांकसंबंधी कामगिरी

EASE 3.0 सुधारणा कार्यक्रम सुरू झाल्यापासून चार तिमाहींमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कामगिरीमध्ये  अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. मार्च 2020 आणि मार्च -2021 दरम्यान पीएसबीच्या एकूण गुणसंख्येत  35% वाढ झाली, सरासरी EASE निर्देशांक गुणसंख्या 100 पैकी  44.2 वरून सुधारून 59.7 वर गेली.  सुधारणा कार्यक्रमाच्या सहा श्रेणींमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आली . सर्वाधिक सुधारणा 'स्मार्ट लेंडिंग' आणि 'इन्स्टिट्यूशनलायझिंग पृडन्ट बँकिंग' श्रेणीत दिसून आली.

EASE 4.0 सुधारणा कार्यक्रम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तंत्रज्ञान -सक्षम बँकिंग, सोपे  आणि सहकार्यात्मक बँकिंगसाठी वचनबद्ध आहे.

पीएसबीसाठी  EASE या  सामायिक  सुधारणा कार्यक्रमाचा उद्देश स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंग संस्थात्मक बनवणे आहे. जानेवारी 2018 मध्ये त्याची प्रथम सुरुवात करण्यात आली होती, EASE 3.0  आर्थिक वर्ष 2020- 21 मध्ये सुरु करण्यात आले. EASE हा पीएसबीमधील सुधारणांचा कणा बनला आहे. सर्वसमावेशक निर्देशांकाच्या स्थापनेने अनेक उपक्रमांच्या वेगवान अंमलबजावणीला उत्प्रेरित केले आहे आणि पीएसबीच्या व्यवसाय मॉडेल आणि प्रक्रिया  अधिक ग्राहक-केंद्री केल्या आहेत.

EASE  सुधारणांची पुढील आवृत्ती म्हणजेच EASE 4.0 चा उद्देश ग्राहक-केंद्री डिजिटल परिवर्तनाचा कार्यक्रम पुढे नेणे आणि पीएसबीच्या कार्यपद्धतीमध्ये डिजिटल वापर आणि डेटा खोलवर रुजवणे हा आहे.

EASE 4.0 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका देऊ करत आहेत-  

अखंडीत बँक सेवा देण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकामधली तंत्रज्ञान प्रणाली आणि अंतर्गत प्रक्रिया दृढ करत नव्या आणि अद्ययावत लवचिक तंत्रज्ञानासह 24x7 बँकिंग सेवा

एसएमएस, मिस्ड कॉल, कॉल सेंटर, इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग यासारख्या डिजिटल माध्यमातून कृषी कर्ज, तिसऱ्या पक्ष समवेत भागीदारी,पर्यायी डाटा देवाण-घेवाण करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान, सर्व प्रक्रिया डीजीटाईझ आणि कृषी कर्ज मंजुरी यासारख्या उपाययोजनेतून डिजिटल आणि डाटा आधारित कृषी वित्त पुरवठा.

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सुरु केलेल्या डोअरस्टेप बँकिंग सेवा व्यापक करण्यासाठी अशा सेवाचा वापर आणि जागृतीसाठी प्रोत्साहन आणि सेवा प्रदान करण्यासाठी कालबद्ध कृती

एनएफसी, भारत क्यूआर आधारीत पेमेंट यांचा अंगीकार करत अर्ध नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन

किरकोळ आणि एमएसएमई ग्राहकांसाठी  विश्लेषण आधारित पत आणि बिगर पत उत्पादने

मोबाईल आणि नंतर इंटरनेट बँकिंग अधिक खोलवर पोहोचावे यासाठी प्रादेशिक भाषात उपलब्धता

सार्वजनिक क्षेतार्तल्या बँकांमध्येसहयोग करत  सहकार्यात्मक बँकिंग,

मंडळाकडून धोरण आणि नियोजन संदर्भातल्या चर्चेच्या वेळेत वाढ 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुधारणा अजेंड्यावर आधारित पावले उचलण्यास याआधीच सुरुवात केली आहे. या सुधारणांमुळे बँकांना कसा फायदा झाला आणि या बँकांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यापुढच्या काळात राबविण्यासाठी हाती घेतलेले नवे उपक्रम याविषयी या बँकांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात माहिती दिली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका कोविड-19 महामारीदरम्यान देशाला आधार देण्यासाठी पुढे आल्या

कोविड-19 महामारीच्या संकटकाळात देखील सरकारी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना विनाव्यत्यय अखंडित सेवा आणि कर्ज पुरवठा केला. देशाच्या दुर्गम भागात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यात देखील या बँका आघाडीवर होत्या.

कर्मचारी वर्गाच्या परीचालनाच्या विविध पद्धतींपासून ते दूरस्थ कामकाजापर्यंत, सर्वांगीण विचार करता, कोविड-19 काळात 80,000 हून अधिक बँक शाखा कार्यान्वित होत्या. त्याखेरीज, मायक्रो-एटीएमच्या माध्यमातून आधार सक्षम भरणा यंत्रणेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांमध्ये दुपटीने वाढ तसेच 75,000 बँक मित्रांच्या माध्यमातून ग्राहकांच्या दाराशी बँकिंग सेवेचा वाढीव पुरवठा करण्यात आला. मार्च 2021 मधील आकडेवारीनुसार या कठीण काळात ग्राहकांना आधार आधारित सेवा  देण्यासाठी बँकांनी कॉल सेंटरद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मोठी वाढ करून 13 प्रादेशिक भाषांमधून 23 विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या. सप्टेंबर 2020 पर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 42 कोटींहून अधिक व्यक्तींना 68,820 कोटी रुपयांची आर्थिक मदत पुरविण्यात आली.

The EASE 4.0 Report can be accessed here.

* * *

Jaydevi PS/Nilima/Sushma/Shailesh/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748940) Visitor Counter : 1032