संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबाद नौकानयन सप्ताहाअंतर्गत 35 वी स्पर्धा

Posted On: 20 AUG 2021 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021

हैदराबाद नौकानयन सप्ताह भारतीय नौकानयन संघटनेने, 35 व्या  नौकानयन चषक स्पर्धेचे हैदराबाद इथल्या हुसेन सागर तलावात 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2021 या काळात आयोजन केले होते. राष्ट्रीय स्तरावरच्या या स्पर्धेत लेझर स्टँडर्ड, 4.7 आणि रेडियल वर्ग बोटीमध्ये  120 जणांनी भाग घेतला.आयएनडब्ल्यूटीसी मुंबईच्या नौदल नाविक पथकातले नऊजण, आयएनडब्ल्यूटीसी विशाखापट्टणम मधून पाचजण आणि आयएनएस मांडोवीवरून नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनी मधून सहाजणानी लेझर 4.7 श्रेणी नौकाचा वापर करत  सहभागी होऊन स्पर्धेची चुरस वाढवली. भारतात  1986 पासून नियमितपणे या स्पर्धांचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते.  लेझर श्रेणीतल्या बोटीचा ऑलिम्पिक स्पर्धेतही उपयोग केला जातो, यामध्ये महिला आणि पुरुष असे  दोन्हीं स्पर्धक  सहभागी होतात.

भारतीय नौकानयन संघटनेचे अध्यक्ष, नौदल प्रमुख एडमीरल करमबीर सिंग यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम झाला.त्यांनी  या स्पर्धकांना प्रोत्साहन देत  भविष्यातल्या नौकानयन स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

 

M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747623) Visitor Counter : 243