कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आजादी का अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत कोळसा मंत्रालयाच्या CMPDIL च्या वतीने दोन दिवसीय हस्तकला प्रदर्शन व विक्री उत्सवाचे आयोजन

Posted On: 19 AUG 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2021

 

आजादी का अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत कोळसा मंत्रालयाच्या CMPDIL अर्थात कोल मायनिंग प्लॅनिंग डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेडच्या वतीने दोन दिवसीय हस्तकला प्रदर्शन व विक्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे।  CMPDIL च्या रवींद्रनाथ भवन मध्ये काल हे प्रदर्शन सूरी झाले सुरू झाले.

या उत्सवात ज्यूट पासून बनवलेली आकर्षक उत्पादने, फ्रेम्स, स्मृतिचित्रे, लाकडी कलाकृती, बांबूच्या कलाकृती, हॅन्ड बॅग आणि टेराकोटा कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रांची जिल्ह्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील स्त्रियांनी या कलाकृती साकारल्या आहेत.

प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापराला आळा घालणे आणि चिकणमाती, ज्यूट, बांबू इत्यादी पर्यावरण स्नेही नैसर्गिक संसाधनांपासून बनलेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालणे आणि स्थानिक कारागिरांना आर्थिक मदत या दृष्टीने याचा उपयोग होईल.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747383) Visitor Counter : 325