दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी भारतीय दूरसंचार सेवेच्या 2018 आणि 2019 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
Posted On:
19 AUG 2021 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2021
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी आज नवी दिल्लीतील निर्वाचन भवन येथे आयटीएस अर्थात भारतीय दूरसंचार सेवेच्या 2018 आणि 2019 या वर्षीच्या तुकड्यांतील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
हा संवाद, आयआयआयडीईएम अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेमध्ये आयोजित केलेल्या आयटीएसच्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता.
आयटीएस हे भारतीय संघराज्यातील ‘अ’ गटातील केंद्रीय नागरी सेवा (राजपत्रित) अधिकारी पद आहे. केंद्र सरकारची दूरसंचार क्षेत्राशी संबंधित क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विषयक सेवा देण्याचे काम हे अधिकारी करतात. आयटीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी नियंत्रण आणि त्यांची सेवा रचना, नेमणूक, प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती, वेतन आणि भत्ते तसेच अनुशासनसंबंधी बाबींचे धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्रीय संवाद मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
भारतीय दूरसंचार सेवेतील अधिकारी दूरसंचार विभागाची धोरणे निश्चित करून त्यांच्या अंमलबजावणीचे काम करतात. तसेच हे अधिकारी दूरसंचार सेवांचे पुरवठादार परवान्यातील अटींनुसार काम करीत आहेत याची खात्री करून घेणे आणि दूरसंचार चौकटीच्या सुरक्षाविषयक बाबींची काळजी घेणे आणि बेकायदेशीर तसेच गुप्त पद्धतीने सुरु असलेले दूरसंचार कार्यान्वयन रोखणे यासाठी देशातील सर्व परवानाधारक सेवा क्षेत्रांत आणि मोठे दूरसंचार जाळे असलेल्या जिल्ह्यांतील प्रदेशात तार प्राधिकरणाची भूमिका देखील बजावतात.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747352)
Visitor Counter : 292