आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि स्वित्झर्लंडचे फाउंडेशन फॉर न्यू डायग्नोस्टिक्स (FIND) यांच्यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 18 AUG 2021 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि स्विझर्लंडच्या फाउंडेशन फॉर इनोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टिक्स (FIND) यांच्यामध्ये परस्पर सहमतीने झालेल्या, भारत आणि स्विझरलँड यांच्यामधील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या चौकटीतील बंध दृढ करण्याच्या हेतूने केलेल्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.

सामंजस्य करारावर फेब्रुवारी 2019 मध्ये भारताकडून स्वाक्षरी करण्यात आली.

 

उपयोग:

भारत आणि स्विझरलँड यांच्यामधील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या चौकटीतील बंध या सामंजस्य करारामुळे अधिक दृढ होतील

 

आर्थिक परिणाम :

या कामातील स्थानिक सहभागीदार व विनंती प्रस्तावांमार्फत आलेले संशोधक यांच्यासाठी भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेकडून 100,000 अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध करेल तर 400,000 अमेरिकन डॉलर्सचा निधी FIND कडून उभा केला जाईल.

 

पार्श्वभूमी:

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद जैव वैद्यकीय क्षेत्रातील विद्यापीठीय तसेच विद्यापीठबाह्य संशोधनासाठी प्रोत्साहन देत असते. फाईंड ही भारतीय कंपनी कायदा 2013 तील कलम 88 अंतर्गत निर्माण केलेली विना-लाभ तत्त्वावरील स्वतंत्र संस्था आहे.

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1747122) Visitor Counter : 181