मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

हायड्रोफ्लुरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी ओझोन स्तर कमी करणाऱ्या घटकांबाबत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


2023 पर्यंत उद्योग क्षेत्रातील सर्व हितधारकांशी आवश्यक सल्लामसलत केल्यानंतर हायड्रोफ्लुरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी राष्ट्रीय धोरण

Posted On: 18 AUG 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हायड्रोफ्लुरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी ओझोन स्तर  कमी करणाऱ्या घटकांबाबत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला  मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर, 2016 रोजी किगाली, रवांडा येथे  मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संबंधित पक्षांच्या 28 व्या बैठकीत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला मान्यता देण्यात आली होती.

 

लाभ :

  1. HFC फेजडाऊनमुळे हरितगृह वायू उत्सर्जन रोखता येईल तसेच हवामान बदल रोखण्यास मदत करेल आणि लोकांना याचा फायदा होईल.
  2. हायड्रोफ्लोरोकार्बनचे उत्पादन आणि वापर करणारे उद्योग मान्य केलेल्या वेळापत्रकानुसार हायड्रोफ्लोरोकार्बन्स टप्प्याटप्प्याने कमी करतील  आणि नॉन-एचएफसी आणि कमी जागतिक तापमानवाढीच्या संभाव्य तंत्रज्ञानाकडे संक्रमण करतील.

 

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे :

  1. 2023 पर्यंत सर्व उद्योग हितधारकांशी आवश्यक सल्लामसलत केल्यानंतर भारतासाठी लागू होणाऱ्या फेज डाऊन वेळापत्रकानुसार हायड्रोफ्लुरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे राष्ट्रीय धोरण विकसित केले जाईल.
  2. विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुधारणा, किगली दुरुस्तीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी हायड्रोफ्लुरोकार्बनच्या उत्पादन आणि वापरावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी ओझोन स्तर कमी करणारे पदार्थ (नियमन आणि नियंत्रण) नियम 2024 च्या मध्यापर्यंत केले जातील.

 

रोजगार निर्मितीच्या संभाव्यतेसह मुख्य प्रभाव:

  1. हायड्रोफ्लोरोकार्बन. टप्प्याटप्प्याने कमी केल्यामुळे हरितगृह  वायूंच्या बरोबरीने 105 दशलक्ष टन कार्बन डाइऑक्साइडचे उत्सर्जन रोखणे अपेक्षित आहे, ज्यामुळे 2100 पर्यंत जागतिक तापमानात 0.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ रोखणे शक्य  होईल,आणि  ओझोन थराचे संरक्षण होईल.
  2. कमी जागतिक तापमानवाढ क्षमता आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून किगाली दुरुस्ती अंतर्गत एचएफसी टप्प्याची अंमलबजावणी केल्यास ऊर्जा कार्यक्षमता वाढेल-आणि कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होईल.
  3. HFC फेझडाऊन अंमलबजावणीमध्ये पर्यावरणीय फायद्यांव्यतिरिक्त आर्थिक आणि सामाजिक सह-लाभ जास्तीत जास्त करण्याच्या उद्देशाने विद्यमान  सरकारी कार्यक्रम आणि  योजनांमध्ये समन्वय साधला जाईल.
  4. उपकरणाच्या घरगुती उत्पादनासाठी तसेच पर्यायी नॉन-एचएफसी आणि कमी जागतिक तापमानवाढीच्या  संभाव्य रसायनांना वाव असेल ज्यामुळे उद्योगाना एचओएफसी फेज डाऊन वेळापत्रकानुसार कमी ग्लोबल वार्मिंग संभाव्य पर्यायांमध्ये संक्रमण करणे शक्य  होईल. याव्यतिरिक्त, नवीन पिढीच्या पर्यायी रेफ्रिजरंट्स आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी देशांतर्गत  नवसंशोधनांना प्रोत्साहन देण्याच्या संधी उपलब्ध होतील.

 

तपशील:

  1. किगाली दुरुस्ती अंतर्गत; मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संबंधित देश हायड्रोफ्लोरोकार्बनचे उत्पादन आणि वापर कमी करतील, ज्याला सामान्यतः एचएफसी म्हणून ओळखले जाते.
  2. हायड्रोफ्लुरोकार्बन ओझोन स्तर रोखणारा  पर्याय म्हणून सादर केले गेले. एचएफसी स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन थर कमी करत नाहीत, त्यांच्याकडे 12 ते 14,000 पर्यंत उच्च जागतिक तापमानवाढीची क्षमता आहे, ज्याचा हवामानावर प्रतिकूल परिणाम होतो.
  3. एचएफसीच्या वापरात वाढ, विशेषतः रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन क्षेत्रातील वाढ लक्षात घेऊन मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील देशांनी किगाली, रवांडा येथे ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या 28 व्या बैठकीत एचएफसीला  नियंत्रित पदार्थ यादीत समाविष्ट करण्यासाठी करार केला. आणि 2040 च्या उत्तरार्धात  80-85 टक्क्यांनी कमी करण्यासाठी एक मुदत द्यायला मंजुरी दिली.
  4. भारत 2032 पासून 4 टप्प्यांत HFCsटप्प्याटप्प्याने कमी करेल, 2032 मध्ये 10%, 2037 मध्ये 20%, 2042 मध्ये 30% आणि 2047 मध्ये 80% कपात

 

किगाली दुरुस्तीपूर्वी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील सर्व सुधारणा आणि समायोजनांना सार्वत्रिक समर्थन आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747086) Visitor Counter : 438