आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती


Posted On: 17 AUG 2021 9:38AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांत 88.13 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या; आतापर्यंत एका दिवसात देण्यात आलेल्या सर्वाधिक लसींच्या मात्रा

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत  देशभरात लसीच्या 55.47 कोटी मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात देशात 25,166 नव्या रुग्णांची नोंद; गेल्या 154 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या, एकूण रुग्णांच्या 1.15%;  हा दर मार्च 2020 पासून सर्वात कमी पातळीवर

देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,69,846; गेल्या 146 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.51%; हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वात अधिक दर आहे

देशात आतापर्यंत एकूण 3,14,48,754 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 36,830 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 53 दिवसांपासून साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3% हून कमी, सध्या हा दर 1.98 %

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.61 %; गेल्या 22 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे

चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ – आतापर्यंत देशभरात एकूण 49.66 कोटी चाचण्या करण्यात आल्या


***

STupe/SampadaP/DY



(Release ID: 1746585) Visitor Counter : 226