गृह मंत्रालय
14 ऑगस्ट हा फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2021 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळण्याच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे.
"देशाच्या फाळणीच्या वेळेस हिंसा आणि आणि द्वेष यांच्या छायेत विस्थापित झालेल्या आपल्या असंख्य बंधू-भगिनींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान यांच्या स्मरणार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संवेदनशील निर्णयाचे मी स्वागत करतो. " असे अमित शाह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
"देशाच्या फाळणीच्या जखमा आणि आपली माणसे गमावण्याचे दुःख या सर्वांचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही. ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ हा समाजातून भेदभावाच्या दुष्प्रवृत्ती आणि विद्वेष दूर करून शांती, प्रेम आणि एकात्मता दृढ करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1745783)
आगंतुक पटल : 358