माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रसार भारतीने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या केलेल्या  सुगम्य आणि समावेशक प्रसारणाला लाखो डिजिटल प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

Posted On: 13 AUG 2021 3:38PM by PIB Mumbai

 

टोक्यो ऑलिम्पिक 2020 साठीच्या  भारतीय पथकाने, अनेक स्पर्धात, भारतासाठीच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत नेत्रदीपक कामगिरी केली.या सर्वोत्तम कामगिरीने ,नव भारतासाठी  अधिक उत्तम कामगिरीसाठी नव्या आशा  पल्लवित केल्या आहेत.भारताची ही कामगिरी प्रत्येक नागरीकापर्यंत सहज आणि सुलभपणे पोहोचवण्यात आपण समावेशक भूमिका निभावल्याचे सांगताना प्रसार भारती अर्थात सार्वजनिक प्रसारण कर्त्याना अतिशय आनंद होत आहे.

ऑलिम्पिकमधल्या विविध क्रीडा प्रकारात आपले चम्पियन्स आपला ठसा उमटवत असताना प्रसार भारतीने आपल्या प्रसारण आणि डिजिटल मंचाद्वारे ऑलिम्पिकमधल्या आपल्या कामगिरीचे दूरचित्रवाणी, रेडीओ आणि स्मार्ट फोन द्वारे घराघरातल्या प्रत्येकापर्यंत त्याचे थेट दर्शन घडवले.

डीडी स्पोर्ट्स आणि ऑल इंडिया रेडीओ स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमाद्वारे   करण्यात आलेले हे  सहजसाध्य प्रसारण,सर्व वयोगटातल्या,सर्व वर्गातल्या, सर्व स्तरातल्या भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरल्याचे, प्रसार भारतीच्या विविध यु ट्यूब चॅनेल आणि न्यूज ऑन एआयआर अॅपवरच्या एकत्रित लाखो डिजिटल दर्शकांच्या संख्येवरून दिसून येत आहे.

 

या मोठ्या संख्येवर एक धावती नजर-

उत्तरदायित्व निभावणारे सार्वजनिक प्रसारणकर्ते म्हणून आपली भूमिका बजावताना प्रसार भारतीने दुर्गम भागापर्यंत आणि मर्यादित साधने असलेल्या भागापर्यंत आपले प्रसारण सुलभपणे  पोहोचेल याची खातरजमा करतानाच दिव्यांग नागरिकांनाही त्याचा आनंद घेता याचीही प्रसारभारतीने काळजी घेतली.ऑलिम्पिक प्रसारणासाठी प्रसार भारतीने 14 सांकेतिक भाषा  निपुण कलावंताच्या मदतीने ऑलिम्पिकचे सांकेतिक भाषेत 240 तास थेट प्रसारण केले. ऑलिम्पिकमधल्या विविध क्रीडा प्रकारात क्षणोक्षणीच्या  घडामोडीं   16 समालोचकानी रेडीओच्या श्रोत्यांसाठी सादर केल्या.

टोक्यो ऑलिम्पिक 2020 चे प्रसारण व्यापक आणि बहु आयामी होते.  ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या थेट प्रसारणा बरोबरच उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण  तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी आभासी कॉन्क्लेव्ह,ऑलिम्पिकसाठीच्या पथकातल्या खेळाडूंच्या यशोगाथा, देशभरातला विजयी जल्लोष आणि इतर घडामोडींचा आमच्या प्रसारणात  समावेश होता.

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745432) Visitor Counter : 240