आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुमारे 53 कोटी
गेल्या 24 तासात 57 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या
भारताने रुग्ण बरे होण्याचा 97.46% हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर गाठला
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 40,120 नवे दैनंदिन रुग्ण
देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या(3,85,227) ही आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.20% इतकी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर(2.04%) गेले 18 दिवस 3% पेक्षा कमी
Posted On:
13 AUG 2021 10:22AM by PIB Mumbai
भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 53 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 60,40,607 सत्रांद्वारे 52,95,82,956 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 57,31,574 मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये यांचा समावेश आहे
HCWs
|
1st Dose
|
1,03,43,406
|
2nd Dose
|
80,50,401
|
FLWs
|
1st Dose
|
1,82,54,407
|
2nd Dose
|
1,19,88,029
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
18,80,51,247
|
2nd Dose
|
1,39,53,516
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
11,48,89,656
|
2nd Dose
|
4,44,21,296
|
Over 60 years
|
1st Dose
|
8,00,90,640
|
2nd Dose
|
3,95,40,358
|
Total
|
52,95,82,956
|
21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
कोरोनातून बरे होण्याचा दर 97.46% झाला असून महामारीची सुरवात झाल्यापासूनचा भारताने गाठलेला हा सर्वोच्च दर आहे.
महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,13,02,345 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 42,295 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात 40,120 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.
सलग 47 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,85,227 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.20% असून मार्च 2020 पासूनची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत असून देशात गेल्या 24 तासात 19,70,495 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 48.94 कोटीहून अधिक (48,94,70,779) चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.13% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.04% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 18 दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 67 दिवस 5% पेक्षा कमी आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745362)
Visitor Counter : 232
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam