युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार 2017-18 आणि 2018-19 साठीचे 22 पुरस्कार उद्या होणार प्रदान


राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या हस्ते S.O.L.V.E.D चॅलेंजच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण

Posted On: 11 AUG 2021 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021

ठळक मुद्दे

  • वर्ष 2017-28 साठी 14, तर 2018-19 साठी 8 पुरस्कार दिले जाणार आहेत.
  • पदक, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये रोख असं वैयक्तिक पुरस्काराचं तर 3,00,000 रुपये रोख असं सांघिक पुरस्काराचं स्वरूप.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं वितरण होणार आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत, आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योगविषयक स्पर्धा S.O.L.V.E.D (सामाजिक उद्दिष्टे-प्रणित स्वयंसेवक उद्योजक विकास) चॅलेंज च्या युवकांच्या दहा टिम्सचा केंद्रीय राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारातील एकूण 22 राष्ट्रीय युवा पुरस्कार यावेळी प्रदान केले जातील. यातील 14 पुरस्कार वर्ष  2017-18 साठीचे असून, त्यात 10 पुरस्कार वैयक्तिक गट तर चार पुरस्कार सांघिक गटातले आहेत.  2018-19 साठी एकूण आठ पुरस्कार दिले जातील, यात, सात पुरस्कार वैयक्तिक तर एक सांघिक श्रेणीतील असेल.  एक पदक, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे वैयक्तिक पुरस्काराचे तर 3 लाख रुपये रोख असे सांघिक पुरस्काराचे स्वरुप आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान केले जातात. समाजातील विविध क्षेत्रे जसे आरोग्य, मानवी हक्क संवर्धन, कृतिशील नागरीकत्व, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना वैयक्तिक(वय वर्षे 15 ते 29) तसेच संस्थाना हे पुरस्कार प्रदान केले जातात.

या पुरस्काराचे स्वरुप युवकांना देशविकासाच्या तसेच समाज सेवेसाठी प्रोत्साहन देणे हे आहे. जेणेकरून, त्यांच्यामार्फत इतरही युवकांना समाजाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव होईल. आणि एक उत्तम नागरिक म्हणून आपल्या क्षमतांचा त्यांचा विस्तार करता येईल. तसेच विविध

क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांचे कार्य पुढे यावे आज त्यांचा कार्याची दखल घेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने  डिसेंबर 2020 साली S.O.L.V.E.D चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण, निमशहरी आज नागरी भागातील युवकांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेचा उद्देश युवकांनी विकसित केलेल्या अभिनव औद्योगिक संशोधनांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हा आहे. कृषी-उत्पादन मूल्यासाखळीशी संबंधित समस्यांवर उपकरणे शोधून काढण्याचे आव्हान या अंतर्गत युवकांना देण्यात आले होते. एकूण 850 युवक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अनेक परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या फेऱ्यानंतर विविध राज्यांमधून 10 युवकांना निवडण्यात आले. यात जम्मू-काश्मिर, बिहार, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमधील युवकांचा समावेश आहे.

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1744910) Visitor Counter : 201