PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
04 AUG 2021 8:37PM by PIB Mumbai
- 48.52 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- 3,09,33,022 total recoveries across the country so far
- Recovery Rate currently at 97.37%
- 36,668 patients recovered during last 24 hours
- India reports 42,625 new cases in last 24 hours
- India's Active caseload currently 4,10,353
- Active cases constitute 1.29% of total cases
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.36%
- Daily positivity rate at 2.31%, remains below 5%
- Testing capacity substantially ramped up – 47.31 crore tests conducted(Total)
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 4 ऑगस्ट 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी काल 48 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 56,83,682 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 48,52,86,570 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 62,53,741 मात्रा देण्यात आल्या. देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,09,33,022 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर 97.37% झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासांत, 42,625 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग अडतीस दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,10,353 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.29% इतके आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,47,518 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात 47 कोटी 31 लाखांहून अधिक (47,31,42,307) चाचण्या करण्यात आल्या.
देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.36% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.31% इतका आहे. आता सलग 58 दिवस दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5% हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :
Important Tweets
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742487)
Visitor Counter : 225