आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आतापर्यंत लसीच्या 48 कोटी मात्रा देऊन भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने पार केला नवा टप्पा


गेल्या 24 तासांत, लसीच्या 60 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रोगमुक्तीचा दर सध्या 97.37% आहे

गेल्या 24 तासांत देशात 42,625 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (4,10,353) एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.29%

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.31%) गेल्या सलग 58 दिवसांपासून हा दर 5% पेक्षा कमी

Posted On: 04 AUG 2021 9:35AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 04 ऑगस्ट 2021
 

भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी काल 48 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 56,83,682 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 48,52,86,570 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 62,53,741 मात्रा देण्यात आल्या.
या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

 

HCWs

1st Dose

1,03,18,462

2nd Dose

79,00,794

FLWs

1st Dose

1,80,03,726

2nd Dose

1,14,89,972

Age Group 18-44 years

1st Dose

16,41,84,445

2nd Dose

98,50,898

Age Group 45-59 years

1st Dose

10,85,51,839

2nd Dose

4,06,01,807

Over 60 years

1st Dose

7,70,32,125

2nd Dose

3,73,52,502

Total

48,52,86,570



देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,09,33,022 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर 97.37% झाला आहे.


 


भारतात गेल्या 24 तासांत, 42,625 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग अडतीस दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,10,353 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.29% इतके आहे.
 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,47,518 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात 47 कोटी 31 लाखांहून अधिक (47,31,42,307) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.36% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.31% इतका आहे. आता सलग 58 दिवस दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5% हून कमी राहिला आहे.


 


 

****
 

STupe/SChitnis/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742207) Visitor Counter : 210