रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केरळमधील कुथिरन बोगद्याची एक बाजू खुली करण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2021 3:49PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी काल एका ट्वीट संदेशात ,केरळमधील कुथिरन बोगद्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याची सूचना केली आहे. हा राज्यातील पहिला रस्ते मार्गावरील बोगदा असून यामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक दरम्यान संपर्क सुविधेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. 1.6 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पीची-वाळानी वन्यजीव अभयारण्याद्वारे तयार करण्यात आला आहे.हा रस्ता वन्यजीवांना धोका न पोहोचवता उत्तर - दक्षिण कॉरिडॉरमधील महत्त्वाची बंदरे आणि शहरांशी संपर्क सुविधा सुधारेल.
श्री गडकरी म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांमध्ये होत असलेले परिवर्तन प्रत्येक नागरिकाला चांगल्या आर्थिक संधी सुनिश्चित करत आहे.
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1741255)
आगंतुक पटल : 332