PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
30 JUL 2021 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 30 जुलै 2021





- देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 45.60 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
- देशभरात आतापर्यंत 3,07,43,972 जण बरे झाले
- सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.38%
- गेल्या 24 तासांमध्ये 42,360 जण बरे झाले
- गेल्या 24 तासात भारतामध्ये 44,230 नवीन रुग्णांची नोंद
- भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,155
- उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.28%
- साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.43%
- दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.44%, हा 5% पेक्षा कमी राहिला आहे
- चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 45 कोटी 60 लाखांचा आकडा पार केला. आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 54,50,378 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 45,60,33,754 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 51,83,180 मात्रा देण्यात आल्या.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,07,43,972 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 42,360 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.38% झाला आहे.
गेल्या 24 तासांत भारतात, 44,230 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग तेहतीस दिवस, 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,05,155 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.28% इतके आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,16,277 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 46 कोटींहून अधिक (46,46,50,723) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.43% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.44% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सलग 53 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :
- सर्व स्रोतांच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 48.03 कोटींपेक्षा जास्त (48,03,97,080) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविल्या आहेत आणि आणखी 71,16,720 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 45,27,93,441लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत (आज सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार) याशिवाय लसीच्या 2.92 कोटीपेक्षा जास्त (2,92,65,015) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
- उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना बालकांसाठी कोविड लस विकसित करण्यास गती देण्याची विनंती केली. विषाणूपासून बालकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य असणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिम ही जनआंदोलन बनायला हवी हे आग्रहाने सांगत त्यांनी लोकांना लसींच्या आवश्यक मात्रा घेऊन स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आवाहन केले.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आज नवी दिल्ली येथे एनसीडीसी अर्थात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या 112व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एएमआरअर्थात सूक्ष्मजीव प्रतिबंधासाठीच्या संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणाच्या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेचे, बीएसएल 3 अर्थात जैवसुरक्षा पातळी 3 च्या प्रयोगशाळेचे तसेच पदवीपश्चात अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि अतिथी निवासाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740894)